दोनदा ब्रश केल्यावरही तोंडात दुर्गंधी येते का? तुम्ही 'या' 5 गंभीर आजारांच्या विळख्यात तर नाही ना?

दोन वेळा ब्रश करुनही तोंडाल दुर्गंधी येते मग याचा अर्थ तुम्हाला या 5 गंभीर आजार तर नाही ना जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात...

नेहा चौधरी | Updated: Jun 12, 2024, 08:45 AM IST
दोनदा ब्रश केल्यावरही तोंडात दुर्गंधी येते का? तुम्ही 'या' 5 गंभीर आजारांच्या विळख्यात तर नाही ना? title=

आपण दात निरोगी राहण्यासाठी सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करतो. पण तरी काही कारणांमुळे श्वासाची दुर्गंधी येते. खरं तर ही एक सामान्य समस्या असून वैद्यकीय भाषेत याला हॅलिटोसिस असं म्हटलं जातं. सगळ्या प्रकारे काळजी घेऊनही ही समस्या जर तुमची पाठ सोडत नसेल तर हे लक्षण काही गंभीर आजारांचं असू शकतं. 

तज्ज्ञ काय म्हणतात?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, श्वासाच्या दुर्गंधीसाठी अनेक वैद्यकीय आणि गैर-वैद्यकीय कारणे असतात. प्रत्येक समस्येमागे कुठलं ना कुठलं कारण असते. ते कारणं काय असू शकतात जाणून घ्या. 

श्वसनमार्गाचा संसर्ग

सायनुसायटिस, ब्राँकायटिस आणि न्यूमोनिया यांसारख्या श्वसन संक्रमणांमुळे श्वासाची दुर्गंधी येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत श्वसनमार्गामध्ये बॅक्टेरियाची संख्या वाढून त्यामुळे दुर्गंधीची समस्याही निर्माण होते. जर्नल ऑफ ओरल मायक्रोबायोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार श्वासोच्छवासातील संसर्ग असलेल्या लोकांमध्ये वाष्पशील सल्फर संयुगे (VSC) चे प्रमाण वाढतं. अशा वेळी आपण बोलता किंवा श्वास सोडताना तुम्हाला दुर्गंधी येते. मग अशावेळी तुम्ही नक्कीच आरोग्य तज्ज्ञांना जाऊ दाखवा. 

हेसुद्धा वाचा - Uric Acid वाढल्यामुळे हाडांमध्ये दुखणं आणि सूज वाढली? मग दररोज खा 'हे' 5 पदार्थ

पाचक प्रणाली समस्या

अ‍ॅसिड रिफ्लक्स, गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिसीज (GERD) आणि पोटात अल्सर यांसारख्या पाचन समस्यांमुळे तुम्हाला श्वासाची दुर्गंधीची समस्या होऊ शकते. पचन व्यवस्थित नसेल तर श्वासातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येते. 

मधुमेह

मधुमेह हा एक चयापचय विकार असून रक्तातील ग्लुकोज किंवा साखरेची पातळी लक्षणीय वाढतं. त्याचबरोबर या गंभीर आजाराने ग्रासल्यानंतरही तोंडातून तीव्र दुर्गंधी येत असते. जर्नल ऑफ डायबिटीज इन्व्हेस्टिगेशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनाचे निष्कर्ष असं सांगण्यात आलं की साखरेचे प्रमाण वाढल्याने श्वासाची दुर्गंधीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. तुम्हाला जर श्वासाच्या दुर्गंधीची समस्या वाढत असेल तर मधुमेहाचे एक महत्त्वाचे लक्षण असण्याची शक्यता आहे. 

हेसुद्धा वाचा - जास्त पाणी प्यायल्याने Bad Cholesterol नियंत्रणात राहतं का? आरोग्य तज्ज्ञ म्हणतात...

किडनी रोग

मूत्रपिंडात कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास श्वासाच्या दुर्गंधीची समस्या जाणवते. आपल्या शरीरात असलेल्या दोन्ही मूत्रपिंडांचे काम रक्तातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करण्याचे असते. अशात मूत्रपिंडात कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास, ते त्यांचे कार्य योग्यरित्या करण्यात अपयशी ठरते. ज्यामुळे विषारी पदार्थ रक्तप्रवाहात जमा होत राहत. या विषांमुळे श्वासाला अमोनियासारखा वास येतो ज्याला 'युरेमिक ब्रीद' असं म्हणतात. 

यकृत रोग

या सर्वांशिवाय श्वासाची सतत दुर्गंधी येणे देखील यकृताच्या आजाराचे लक्षण असू शकतं. लिव्हर सिरोसिस किंवा फॅटी लिव्हर डिसीजमुळे शरीरात टॉक्सिन्स जमा होत, ज्यामुळे श्वासाची दुर्गंधी येण्याची समस्याही वाढते. त्यामुळे डॉक्टरकडे जाऊन यकृत तपासणे गरजेचे आहे. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)