Viral Message : केस सरळ करण्याच्या विचार करत असाल तर वेळीच सावध व्हा. हेयर स्ट्रेटनिंग (Hair Straightening) जीवावर बेतू शकते... स्ट्रेटनिंगमुळे कॅन्सरचा धोका (Cancer Risk) अधिक वाढतो असा दावा करण्यात आलाय. महिला सर्वाधिक हेयर स्ट्रैटलिंग करतात. हेयर स्ट्रेटनिंगचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे तात्पुरती आणि दुसरी परमनंट स्ट्रेटनिंग. या दोन्ही स्ट्रेटनिंगमुळे कॅन्सरचा धोका आहे का? याची पडताळणी करणं गरजेचं आहे. महिलांच्या आरोग्याचा प्रश्न (Health Issue)  असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल मेसेज
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या (National Institutes of Health) अभ्यासानुसार, केमिकल हेयर स्ट्रेटनरचा (Chemical hair straighteners) वारंवार वापर केल्यास महिलांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सरचा (Uterine cancer) धोका दुपटीनं वाढतो. हा दावा धक्कादायक असल्याने या दाव्याबाबत अधिक माहिती जाणून घेतली. आमच्या पडताळणीत काय पोलखोल झाली पाहुयात.


व्हायरल पोलखोल






केसांसाठी केमिकलयुक्त प्रोडक्टचा वापर टाळावा परमनंट हेयर स्ट्रेटनिंगसाठी केमिकलंचा अधिक वापर केल्याने कॅन्सरचा धोका संभवतो. यावर अजूनही रिसर्च सुरु आहे. तरीदेखील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केसांना केमिकल्स वापरणं टाळायला हवं.