Health Tips : शरीरात होणारे बदल सतत अनेक गोष्टींकडे लक्ष वेधत असतात. बऱ्याचदा सर्वसामान्य लक्षणेही एखाद्या मोठ्या आजाराकडे खुणावतात. तर, काही वेळेस शरीराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या घटकांच्या कमतरतेबाबत सतर्क करतात. शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमधे महत्त्वाची भूमिका बजावते ते म्हणजे व्हिटॅमिन बी 12. याच्या कमतरतेमुळे अनेकदा व्यक्तीला काही अडचणींचा सामना करावा लागतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता म्हणजे काय?
व्हिटॅमिन बी 12 च्या (Vitamin B12 Deficiency) कमतरतेमुळे शरीरात असामान्य लाल रक्तपेशी तयार होतात त्यामुळे मेगाब्लॉस्टीक ॲनेमिया तयार होतात. व्हिटॅमिन बी 12 हे अनेक जीवनसत्त्वांपैकी विशेष आहे जे शरीरातील पेशींची निर्मिती तसेच तुमची उर्जा पातळी राखण्यासाठी आवश्यक आहे. व्हिटॅमिन बी 12 हे प्रामुख्याने डेअरी आणि मांस उत्पादनांमध्ये आढळते. (Vitamin B12 Deficiency Keep forgetting things A very important element is decreasing in the body nz)


व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असणारी लक्षणे -


1. अ‍ॅनिमियाची (anemia) सौम्य लक्षणं 
शरिरातील लाल रक्तपेशींची संख्या कमी झाली की, अ‍ॅनिमियाची समस्या निर्माण होते.  व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता आढळून येणारे हे सामान्य लक्षण आहे. 


2. समजण्यास अडचणी येणे
 संभ्रम, चिडचीडेपणा, डोकेदु:खी आणि विसरभोळेपणा या गोष्टी वारंवार होणे. ही व्हिटॅमिन B 12 ची लक्षणे प्रामुख्याने 50 च्या पुढील व्यक्तींमध्ये आढळतात.  


आणखी वाचा - Post Pregnancy Tips : प्रसूतीनंतरचा थकवा कसा दूर कराल? महिलांसाठी महत्त्वाची बातमी


3. छातीतले ठोके आणि श्वासाची समस्या निर्माण होणे  


शरिरात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे अशक्तपणा (Weakness) येऊ शकतो, ज्यामुळे पेशींच्या विकासावर परिणाम होत असल्याने थकवा किंवा हृदयाचे ठोके जलद होण्याची समस्या उद्भवू शकते. तसेच, श्वासोच्छवासाच्या समस्याही उदभवू शकतात. 



4. फिकट गुलाबी त्वचा 
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे त्वचेवर पुरळ उठणे, रिंकल्स आणि पिंपल्स यारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच, इतर घटनांमध्ये त्वचा फिकट आणि रंगहीन होऊ शकते. 


आणखी वाचा - आई होण्याचं योग्य वय कोणतं? ही माहिती ठाऊक असायलाच हवी...


5. जीभ कोरडी होणे  


व्हिटॅमिन B 12 च्या कमतरतेमुळे घसा खवखवणे किंवा जीभ कोरडी होणे ही लक्षणे (symptoms) सामान्य आहेत. त्यामुळे जीभेवर फोड येण्याचे प्रमाण देखील वाढताना दिसते. ही लक्षणे सर्वसामान्य असली तरी त्यांचे शरीरावर होणारे परिणाम कालांतराने गंभीर स्वरुप घेतात. त्यामुळे याकडे कधीच दुर्लक्ष करु नका.


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)