Right Age to Get Pregnant: आई या शब्दात सगळी जादू आहे. आई होण्यासाठी शारिरीक आणि मानसिक तयारी असली पाहिजे. बरं, आई व्हावं की होऊ नये, कोणत्या वयात व्हावं हा ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आई म्हंटलं की जवाबदारी आणि त्याग हे दोन्ही विषय येतात. अनेकदा स्त्रीया करिअरसाठी आई होण्याचा निर्णय उशिरा घेतात.
तर, काही महिला लवकर आई व्हायचा निर्णयही घेतात. कारण त्यांना ती जवाबदारी पार पाडायची असते, ते सुख अनुभवायचं असतं. मग अशावेळेस नक्की कोणत्या वयात आई व्हावं? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. अशात नेमकं तज्ज्ञ काय सांगतात? याबाबत बातमीत आम्ही माहिती देणार आहोत. (the best Age to Get Pregnant according to experts NZ)
स्त्री रोग तज्ञांच्यामते, वयाची 25 ते 35 वर्ष आई होण्यासाठीचं योग्य वय आहे. आता तुम्ही विचाराल हेच वय कशाला? तर यामागे अनेक पैलू आहेत. 25 ते 35 वर्षानंतर मूल होऊ शकत नाही अशातला भाग नाही. पण 35 वर्षानंतर बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागेल.
स्त्रीच्या गर्भाशयातील अंडाशयात अंडी तयार होत असतात. तसेच पुरुषांच्या टेस्टीकलमध्ये एकाच वेळेस लाखो स्पर्म तयार होत असतात. तज्ज्ञांच्या मते स्त्रियांच्या वाढत्या वयामुळे गर्भाशयात गुंतागुंत वाढू शकते. अनेकदा गर्भाशयाती अंडाशयातील अंड्यांची संख्या कमी होऊ लागते.
1. जेव्हा एखाद्या मूलीचा जन्म होतो तेव्हा तिच्या गर्भाशयात 10 लाख अंडी असतात.
2. मुलींची पाळी (Periods) सुरु झाल्यावर त्या अंड्याची संख्या 3 लाख इतकी होते.
3. वयाच्या 37 वर्षी हीच संख्या आणखी कमी होऊन 25,000 इतकी कमी होते.
4. तर वयाच्या 51 वर्षापर्यंत याचंच प्रमाण 1000 खाली येतं.
5. त्यातही फक्त 300 ते 400 अंड्यांमध्ये मूल जन्माला घालण्याची क्षमता असते.
जसं जसं महिलांचं वय वाढतं, तसं तसं जाते तस तसे त्यांच्या अंडाशयातील अंड्याची संख्या कमी होत जाते. त्यामुळे या अंड्यातील गुणवत्ता आणि दर्जा देखील कमी होतो.
बाळाला कोणत्या वयात जन्माला घालायचे हा त्या पालकांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र बाळ सुधृढ असावं हे प्रत्येक पालकाला कायम वाटतं. मग अशात बाळाला जन्म घालण्यासाठी 25 ते 35 वर्ष ही योग्य वेळ आहे स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)