Vitamin Deficiency : अन्नामधील अनेक पोषक तत्वं आपल्या शरीराला आवश्यक असतात. अन्नात असलेली पोषक तत्वे आपल्याला अनेक आजरांपासून दूर ठेवतात, ही पोषक तत्वे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. आपल्या शरीराला रोजच्या जीवनात हालचाल करण्यापासून सगळी कामं करण्यासाठी ताकदची गरज असते आणि ते आपल्याला तेव्हाच मिळेल जेव्हा आपण काही पोषक पदार्थ खाऊ. मात्र, व्हिटामिन्सची शरीरात कमतरता झाली तर त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ लागतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिटामिन्सचे आपल्या आरोग्यात खूप महत्त्वाचे स्थान आहे. हे व्हिटामिन्स आपल्या शरीरातील अवयवांचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी मदत करतात. मात्र हे व्हिटामिन्सची कमतरता शरीरात जाणवली तर त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणा होतो. चला तर जाणून घेऊया शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता कशी ओळखावी? 


व्हिटॅमिनच्या कमतरतेची लक्षणे (How To Know If Your Are Facing Vitamin's Deficiency)


हिरड्यांमधून रक्त येणे
व्हिटॅमिन सी ची कमतरता शरीरात असेल तर हिरड्यांच्या समस्या उद्भवू शकतात. इतकंच काय तर हिरड्यांतून रक्त येणे हे सगळ्यात मुख्य कारण असते. शिवाय रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होते, या समस्येचा उपाय म्हणून तुम्ही संत्री, मोसंबी, लिंबू, यांचे सेवन करायला हवे.


कमकुवत नखे आणि केस
व्हिटॅमिनची कमतरता असेल तर त्याचा आपल्या सौंदर्यावरही परिणाम होऊ शकतो. नखं आणि केस पूर्वीपेक्षा कमजोर होऊ लागतात, ज्यामुळे ते सहजपणे तुटू शकतात शिवाय केसांच्या समस्या निर्माण होऊन तुम्हाला टक्कल देखील पडू शकते.


हेही वाचा : Lucky Moles : तुमच्या शरीराच्या 'या' भागावर तीळ आहे का? तर व्हाल धनवान


रातांधळेपणा
काही लोकांना रात्री कमी दिसतं, या आजाराला रातांधळेपणा म्हणतात. व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे हा आजार होऊ शकतो, यासाठी आहारामध्ये  पालक आणि पपई याचे सेवन वाढवावे. 


तोंडात फोड येणे 
तोंड येणं किंवा तोंडात फोड आल्यास जेवण करताना खूप त्रास होतो. हे सहसा व्हिटॅमिन बी 12 आणि आयरनच्या कमतरतेमुळे होते. यासाठी तुम्ही फॅटी फिश आणि फोर्टिफाइड तृणधान्ये खाऊ शकता.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)