मुंबई : रात्री अर्धवट झोप झाल्यास दिवसभर थकल्यासारखं आणि अस्वस्थ वाटतं. सातत्याने अपुरी झोप मिळाल्यास त्याचा परिणाम तुमच्यावर आणि तुमच्या आरोग्यावर होतो. मोबाईलच्या व्यसनामुळे झोपेचे चक्र बिघडतं. आजकाल अनेकांना रात्रभर सोशल मिडिया अपडेट्स चेक करत राहण्याची सवय असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचप्रमाणे बदललेल्या जीवनशैलीमुळे रात्री कॉफी पिणं, फ्रेंड्स, कलीगसोबत गप्पा करणं यामुळे अनेकजणांना झोप येत नाही. मात्र लवकर झोपण्याचे देखील फायदे आहेत, याची तुम्हाला कल्पना आहे का?


लवकर झोपण्याचे फायदे


चेहऱ्यावरील डाग कमी होतात


लवकर झोपल्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतो. यामुळे पिंपल्स कमी होऊ लागतात. शिवाय डाग हळूहळू कमी व्हायला सुरवात होते.


भूकेत सुधारणा


जीवनशैली योग्य नसली की आपल्याला झोपेच्या समस्या उद्धभवतात. मात्र एकदा का झोप पूर्ण झाली की आता हेल्दी पदार्थ खावेसे वाटतात. झोप पूर्ण होत नसलेल्या व्यक्तींना पिझ्झा, बर्गर, नुडल्स खावेसे वाटतात. मात्र झोप पूर्ण झाल्यानंतर जंक फूड खाणं लोकं टाळतात.


मायग्रेनचा त्रास कमी होतो


लवकर आणि पुरेशी झोप घेतल्याने कमी खाणं तसंच मायग्रेनचा त्रास जाणवत नाही. पुरेशी झोप घेतल्याने मायग्रेनचा त्रास कमी होता. शिवाय हा त्रास कमी झाल्याने लोकं औषधंही कमी घेतात.