पायांची सूज कमी करायची असेल तर दररोज करा `ही` गोष्ट!
पायांची काळजी घ्यायचं म्हटलं तर आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही.
मुंबई : आपण दर दिवसाला पायांचा सर्वात जास्त वापर करतो. मात्र त्यांची काळजी घ्यायचं म्हटलं तर आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही. मुळात पाय सुंदर ठेवणं म्हणजे पायांची काळजी घेणं नव्हे. तर पायांच्या तळव्यांची तेलानं मालिश करणं म्हणजे पायांची काळजी घेणं.
पायाच्या तळव्यांची मालिश केल्याचा फायदा केवळ पायांना होत नाही तर आरोग्यशी संबंधित अनेक समस्या पायाच्या तळव्यांची मालिश केल्यानं बर्या होतात. जाणून घेऊया पायाच्या तळव्यांना मालिश केल्याने होणारे फायदे-
ब्लड प्रेशरची समस्येपासून आराम
चुकीच्या जीवनशैलीमुळे कमी वयात रक्तदाबाची समस्या जाणवते. अशा रूग्णांनी झोपतांना पायाच्या तळव्यांची तेलाने मालिश केलं पाहिजे. यामुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. यामुळे हदय रोगाचा धोकाही कमी होतो. मालिश केल्याने रक्त प्रवाह देखील सुधारतो.
पायांची सूज कमी होते
गरोदरपणात महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. अशावेळी महिलांच्या पायांना सूज येते. अशा काळात महिलांचे टाच आणि घोटे दुखतात. अशा परिस्थितीत पायाच्या तळव्याना मालिश केल्यास सूज कमी होण्यास मदत होते.
पीरियड्सचा त्रास होतो कमी
पाळीच्या काळात महिलांना अनेक त्रासाला सामोरं जावं लागतं. पाळीमुळे मूड स्विंग्ज होणं, भीती वाटणं, चिडचिड होणं, झोप उडणं, डोकेदुखी यांसारख्या समस्या समोर येतात. यावेळी मिनिटं पायाच्या तळव्यांची तेलाने मालिश केल्यास ही लक्षणं कमी होतात. त्याचप्रमाणे पीरियड्समध्ये होणार्या वेदना कमी होतात.