How to getup early:  सकाळी उठायचा अनेकांना प्रचंड कंटाळा येतो. यापैकी अनेकांना आपण सकाळी लवकर उठावं असं वाटत तर असतं मात्र आदल्या दिवशीची धावपळ किंवा कामाच्या गडबडीत थकल्याने दुसऱ्या दिवशी ठरवूनही लवकर उठता येत नाही. यशस्वी व्हायचं असेल तरस सकाळी लवकर उठल्यालाच हवं असं आपण अनेक ठिकाणी वाचलं असेल, अनेकांकडून ऐकलं असेल. मात्र रात्री सहज सोपी वाटणारी गोष्ट सकाळी तितकीच कठीण वाटते. मग अलार्म वर अलार्म वाजत राहतो आणि शेवटी तुम्ही सूर्य डोक्यावर आल्यावर झोपून उठतात. या बातमीत आम्ही तुम्हाला सकाळी लवकर उठण्याच्या सोप्या आणि जबरदस्त टिप्स देणार आहोत. (Want to wake up early in the morning but cant Some tips for you)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्री उशिरा जेवण टाळा. जर तुम्ही खुप उशिरा जेवत असाल तर तुमची पचनक्रिया मंदावते आणि तुम्हाला झोप उशिरा येते. जर तुम्हाला जेवल्यानंतर चटतपटर खाण्याची सवय असेल तर (Late Night Snacks) ही सवय तातडीने बंद करा. जेवल्यानंतर लगेचच झोपू नका. किमान काहीवेळ तरी शतपावली करणे गरजेचे आहे. रात्रीच्या जेवणानंतर कोमट पाणी पिल्यास आपली पचनक्रिया जलद होते.


आणखी वाचा... तुमच्या मनात सतत लैंगिक संबंधाविषयी विचार येत असतील तर...; ही समस्या तर नाही ना?


मोबाईलचा वापर टाळा


ऑफिसमध्ये आपण पूर्णवेळ लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर घालवतो. त्यानंतर घरी आल्यावर आपल्या मोबाईलचा डेटा संपला नाही म्हणून मोबाईल वापरतो. यामुळे तुमचे डोळे ठाकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, झोपण्याआधी 2 तास आपला मोबाईल डोळ्यांपासून दुर ठेवा. दिवसभर आपण लॅपटॉप आणि मोबाईल स्क्रीनसमोर असल्यामुळे डोळ्यांवर प्रचंड ताण येतो. तुम्हाला सकाळी लवकर उठायचं असेल तर मोबाईल दूर ठेवायलाच लागेल. तुमचा मोबाईल दूर ठेवलात की त्याचा आवाजही कमी करा किंवा डेटा बंद करा, नाहीतर सारखे मेसेज येत राहतील, मोबाईल वाजत राहील आणि तुमची झोप होणार नाही. 


झोपायच्या आणि उठायच्या वेळा ठरवा 


तुमची झोपायची आणि उठायची वेळ निश्चित असेल तर तुमच्या शरीराला त्याची सवय होते. (Biological Clock) यामुळे तुम्हाला रात्री ठरलेल्या वेळी झोप आणि सकाळी ठरलेल्या वेळी जाग येण्यास मदत होते. तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे म्हणून उठू नका, झोप पूर्ण होणं गरजेचं आहे. रात्रीची झोप 7-8 तास पुर्ण झाली पाहिजे याची काळजी घ्या.


सकाळी उठताच हे काम करा


सकाळी उठल्यावर अंथरुणात पडून राहू नका. उठल्यावर खोलीतल्या सगळे लाईट्स सुरु करा, किंवा खिडक्या उघडून घरात प्रकाश येऊ द्या. यामुळे तुम्हाला परत झोपावं वापटणार नाही. जमल्यास सकाळी 15 मिनिटं बागेत किंवा घरच्या व्हरांड्यात चाला. 


आणखी वाचा... तुम्हाला मूनलायटिंग करायला आवडेल का? जाणून घ्या सर्वकाही...  


मेडिटेशन गाणी ऐका 


रात्री झोप येत नसेल तर तुम्ही मेडीटेशन आणि हीलिंग गाणी ऐकू शकतात. याचा फायदा तुम्हाला चांगली झोप येण्यास नक्की होईल. याने दुसऱ्या दिवशी तुमची सकाळची आनंदी होईल. 


रात्री निवांत झोप लागेल याची काळजी घ्या. त्यासाठी तुम्ही झोपताना कोणत्याही प्रकारचा ताण न घेता झोपाल याची यावर लक्ष द्या. 


मराठीत याबाबतची एक चांगली म्हण आहे, लवकर निजे , लवकर उठे, तया ज्ञान, संपत्ती,आरोग्य लाभे !!


आणखी वाचा... Top Benefits Of Dry Fruit : ड्रायफ्रूट्स खाल्यास तुम्हाला 'असे' होतील फायदे....​


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)