तुमच्या मनात सतत लैंगिक संबंधाविषयी विचार येत असतील तर...; ही समस्या तर नाही ना?

लैंगिक समस्येविषयी अजूनही समाजात टॅबू आहे.

Updated: Sep 17, 2022, 12:30 PM IST
तुमच्या मनात सतत लैंगिक संबंधाविषयी विचार येत असतील तर...; ही समस्या तर नाही ना? title=

मुंबई : आजकाल आजाराची समस्या वाढताना दिसतेय. अशातच लैंगिक जीवनात लोकांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतं. मात्र अनेकदा लोकं त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. अशात एक दुर्लक्षित समस्या म्हणजे काही लोकांच्या मनात सतत सेक्स म्हणजेच शारीरिक संबंधाबाबत विचार सुरू असतात. याचाच अर्थ पुरूषाने जर एखाद्या आकर्षक महिलेकडे पाहिले तर ते उत्तेजित होतात. अनेकदा हीच गोष्ट महिलांसोबतही होते. 

लैंगिक समस्येविषयी अजूनही समाजात टॅबू आहे. त्यामुळे अनेकजण ही बाब डॉक्टरांना सांगण्यासही कचरतात. मात्र असं करू नये. यामुळे जी काही समस्या असेल तर अधिक वाढेल. या समस्येबाबत लोकांच्या मनात फार भीती असते. पण खरंच या गोष्टीची भीती वाटली पाहिजे का?

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, एखाद्या व्यक्तीसोबत सेक्शुअल विचार येणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. मात्र दुसरं काहीच सुचत नसेल तर ही समस्या गंभीर असण्याची शक्यता आहे. साधारण दुसऱ्या व्यक्तींबाबत तुमच्या मनात असे विचार येण्याची विविध कारणे असू शकतात. 

ही कारणं म्हणजे, तुमच्या पार्टनरची तुम्हाला साथ नसणं, पार्टनरसोबत सेक्शुअल लाइफ एन्जॉय न करू शकणं, गरजेच्या वेळी पार्टनर जवळ नसणं, शारीरिक संबंधाबाबत दोघांमध्ये मतभेद निर्माण होणं, पण ही एक सामान्य प्रक्रिया असून ही पुरूष आणि महिला दोघांमध्येही दिसून येक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

अशाप्रकारचे विचार रोखू न शकणं किंवा असा स्वभाव असणं जसं की,  पुरूषांचं, महिलांचं गुप्तांग बघणं किंवा हस्तमैथुन करणं हे दर्शवतात की, तुम्ही एका वेगळ्या प्रक्रियेतून जात आहात, जी असामान्य असते. अशात वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.