मुंबई : पाणी हे शरीरासाठी खूप महत्वाचं आहे. ज्यामुळे आरोग्याशी संबंधी समस्या लांब राहातात. आपण पाणी थंड, साधं किंवा गरम पीतो, पण गरम पाणी पिण्याचे वेगवेगळे फायदे आहेत. वेगवेगळ्या पदार्थांसह गरम पाणी प्यायल्याने शरीराच्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. रोज सकाळी गरम पाणी प्यायल्यास अनेक आजारांपासून मुक्ती मिळते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चला जाणून घेऊ या गरम पाणी पिण्याचे फायदे


पचनक्रिया मजबूत होईल


पचनाशी संबंधित समस्यांमध्ये गरम पाणी खूप फायदेशीर आहे. हे चयापचय सुधारते. शरीरात जाऊन हानिकारक जीवाणू नष्ट करते. तसेच गरम पाणी पचनक्रिया मजबूत करते. त्यामुळे पोट योग्य प्रकारे साफ होतं. यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. योग्य पचनाने, अनेक समस्या स्वतःच दूर होतात.


हृदयाच्या समस्या दूर होतील


बरेच लोक म्हणतात की, रोज हलके कोमट पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते. कोलेस्टेरॉलमुळे हृदयाशी संबंधित आजार होतात, त्यामुळे अशा प्रकारे हृदयाशी संबंधित समस्यांवर मात करता येते. पण डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.


घसा खवखवणे


घसा खवखवल्यास कोमट पाण्यात मीठ टाकून गार्गल करावे. यामुळे घशातील उबळ कमी होते आणि दुखण्यापासून आराम मिळतो. कोमट पाणी प्यायल्याने घशाची खवखवही बरी होतो. सर्दी झाल्यावर देखील गरम पाणी प्यायल्याने त्वरित आराम मिळतो.


वजन कमी होईल


कोमट पाण्यात मध मिसळून दररोज रिकाम्या पोटी प्यावे. यामुळे अतिरिक्त चरबी कमी होते आणि लठ्ठपणा दूर होतो. रोज गरम पाण्यात लिंबू टाकून प्यायल्याने लठ्ठपणा दूर होतो.


ग्लोइंग स्किन


तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, पार्लरमध्ये फेस ट्रीटमेंट केल्यानंतर स्टीम दिली जाते, त्यामुळे चेहऱ्यावर चमक येते. गरम पाणी प्यायल्याने शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात. खराब बदार्थ बाहेर पडल्यामुळे त्वचा चमकदार होते. चेहऱ्याला तजेलदार बनवण्यासाठी भरपूर प्रमाणात साधे पाणी पिण्याचाही सल्ला दिला जातो.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)