मुंबई : कोरोना महामारीच्या काळात पॅरासिटामॉलचा वापर झपाट्याने वाढला आहे. तसेच थंडीमध्ये देखील सामान्य प्रमाणात लोकं सर्दी किंवा ताप आल्यावरती डॉक्टरकडे न जाता स्वत:च पॅरासिटामॉलचे सेवन करतात. परंतु आता एका संशोधनात असे समोर आले आहे की, त्याचा अतिवापर केल्याने तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्याच्या रोजच्या वापरामुळे रक्तदाब, हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.


पॅरासिटामॉल घेताना डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संशोधनात सहभागी असलेल्या तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे की, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका असलेल्या लोकांनी पॅरासिटामॉल घेताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


एडिनबर्ग विद्यापीठातील तज्ज्ञांनी याबाबत संशोधन केले, यासाठी त्यांनी उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांचा अभ्यास केला. उच्च रक्तदाबाचा इतिहास असलेल्या 110 रुग्णांचा या संशोधनात समावेश करण्यात आला.


रुग्णांना दोन आठवडे पॅरासिटामॉल देण्यात आले


रुग्णांना दोन आठवडे दिवसातून चार वेळा पॅरासिटामॉलच्या गोळ्या देण्यात आल्या. चार दिवसांनी तपासणी केली असता, या रुग्णांचा रक्तदाब लक्षणीय वाढला होता. उच्च रक्तदाबामुळे या रुग्णांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 20 टक्क्यांनी वाढली.


हे संशोधन ब्रिटनमधील लोकांवर करण्यात आले आहे. 10 पैकी एक व्‍यक्‍ती दीर्घकालीन वेदनांसाठी दररोज पॅरासिटामॉल सप्लिमेंट घेते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की यूकेमधील तीनपैकी जवळजवळ एक प्रौढ व्यक्ती उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहे.


या रुग्णांनी पॅरासिटामॉलपासून दूर राहावे


एडिनबर्ग युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डेव्हिड वेब म्हणाले की, आतापर्यंत पॅरासिटामॉलला सुरक्षित औषध म्हणून पाहिले जात होते. पण या संशोधनानंतर रुग्णांनी पॅरासिटामॉलपासून दूर राहावे. असे डॉक्टर सांगतात.


एनएचएस लोथियन येथील क्लिनिकल फार्माकोलॉजी आणि नेफ्रोलॉजीमधील सल्लागार लीड इन्व्हेस्टिगेटर डॉ इयान मॅकइंटायर म्हणाले, 'डोकेदुखी किंवा तापासाठी पॅरासिटामॉलचा अधूनमधून वापर करणे चांगले आहे. परंतु जे लोक दीर्घकाळापर्यंत किंवा नियमितपणे ते घेत आहेत त्यांच्यासाठी ही धोक्याची आहे.


त्यामुळे तुम्ही देखील पॅरासिटामॉल खाणे धोक्याचे आहे. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही गोष्ट करु नका.