मुंबई : आजकाल तणावग्रस्त जीवनशैली, पोषक आहाराचा अभाव यामुळे अनेक आरोग्याच्या समस्यांना आपण आमंत्रण देत आहोत. अशातच ऐन तारूण्यात हार्ट अटॅक येण्याचं, हर्‍द्यविकारामुळे बळी जाण्याचं प्रमाण वाढलं आहे.  केवळ हृद्यविकार नव्हे तर कार्डिएक अरेस्टमुळे मृत्यू होण्याचेही प्रमाण वाढले आहे. मग पहा अशा कधीही, केव्हाही आणि कुठेही जीवावर बेतणार्‍या हृद्यविकाराचा धोका वेळीच कसा ओळखावा? 


आरोग्य देते पुरेसे संकेत 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हृद्यविकाराचा झटका कधीही जीवघेणा ठरू शकत असला तरीही त्याचा धोका वेळीच ओळखता येऊ शकतो. त्यासाठी शरीर देत असलेल्या या संकेताकडे मूळीच दूर्लक्ष करू नये. 'या' रक्तगटाच्या रुग्णांंना हार्टअटॅकचा धोका कमी , संशोधकांंचा नवा खुलासा


हार्ट अटॅकची लक्षणं कोणती ? 


श्वास घेताना त्रास होणं हे हार्ट अटॅकचं एक महत्त्वाचे लक्षण आहे. श्वास घेताना त्रास जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. 


आजच्या धकाधकीच्या जीवनात थकवा जाणवणं सामान्य असलं तरीही पुरेसा आराम करूनही प्रसन्न न वाटणं ही धोक्याची घंटा आहे. तुम्हांला सतत थकल्यासारखे वाटत असल्यास त्याकडे वेळीच लक्ष द्या.   


डीहायड्रेशन किंवा धावपळीत खायला वेळ न मिळाल्याने चक्कर येऊन पडणं ठीक आहे. मात्र चक्कर येण्याचं प्रमाण वाढल्यास काळजी घ्या. शरीरात ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने चक्कर येण्याचे प्रमाण वाढते. 


छातीत दुखणे हे देखील हृद्यविकाराचा धोका असल्याचे संकेत देतात. अनेकदा हृद्यविकार आणि अ‍ॅसिडीटी यांच्यामध्ये गल्लत होण्याचं कारण  आहे. 


सर्दी, खोकला आणि डोकेदुखी हा त्रास सतत जाणवत असल्यास किंवा खूप काळ त्रासदायक ठरणं हे चांगले लक्षण नव्हे. अनेकदा या समस्या लहान समजल्या जातात. मात्र यामधूनच हृद्यविकाराचा धोका मिळत असल्याचे विसरू नका. त्यामुळे घरगुती उपायांवर अवलंबून राहण्यापेक्षा तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.   या चहाने दिवसाची सुरूवात केल्याने हृद्यविकाराचा धोका कमी होतो.