Water In Lungs : फुफ्फुस हा शरीराचा एक नाजूक भाग आहे. सर्दी, न्यूमोनिया आणि विषक्त पदार्थमुळे फुफ्फुसांचा (lungs problem) त्रास होतो. कधी कधी फुफ्फुसात पाणी तयार होते आणि आपल्याला ते कळतही नाही. फुफ्फुसात पाणी भरणे ही एक गंभीर समस्या आहे. त्याला पल्मोनरी एडेमा (Pulmonary edema) म्हणतात. फुफ्फुसात पाणी भरल्यावर कोणती लक्षणे दिसतात आणि कोणत्या पद्धतींच्या मदतीने या समस्येवर मात करता येते हे जाणून घेऊया. (water in lungs can be a cause of lung failure pulmonary edema)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पल्मोनरी एडेमाची लक्षणे


फुफ्फुसात पाणी भरले तर अनेक समस्या उद्भवू लागतात. फुफ्फुसात पाणी भरण्याची समस्या असल्यास श्वासोच्छवासाचा त्रास, छातीत दुखणे, अस्वस्थता वाटणे, खोकला, जास्त घाम येणे, हृदयाचे ठोके वाढणे, श्वास घेताना घरघर आवाज येणे, गुदमरणे अशी सुरुवातीची लक्षणे दिसतात. जसजसा त्रास वाढतो तसतसा श्वास घेण्यास त्रास होतो आणि पायांना सूज येऊ लागते.


आहार कसा घ्यावा


पल्मोनरी एडीमाची (Pulmonary edema) समस्या असल्यास सकस आहार घ्यावा. आहारात भरपूर पोषणयुक्त पदार्थांचा समावेश करावा. ताजी फळे, हिरव्या भाज्या, अंडी, चिकन, मासे, शेंगदाणे, शेंगा, सुका मेवा या गोष्टींचे सेवन करावे. लसूण, लिंबू आणि काळी मिरी यांसारख्या मसाल्यांचे सेवन फायदेशीर ठरते.


वाचा : 'हा खेळाडू फक्त IPL खेळण्यासाठी फिट', सोशल मिडीयावरून team India चा खेळाडू ट्रोल


काय खाऊ नये


जर फुफ्फुसात पाणी भरले असेल आणि श्वास घेण्यास त्रास (Difficulty breathing) झाल्यासारखी लक्षणे दिसत असतील तर मीठाचे सेवन कमी करावे. कारण जास्त प्रमाणात सोडियम (Sodium) फुफ्फुसांना नुकसान पोहोचवू शकते. फुफ्फुसात पाणी भरलेले असताना थंड पदार्थांचे सेवन करू नये, यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.


दारू आणि धूम्रपानापासून दूर रहा


धूम्रपान आणि मद्यपान (Smoking and drinking) हे फुफ्फुसाच्या आजाराचे सर्वात मोठे कारण आहे. फुफ्फुसात समस्या असल्यास सिगारेट, दारू, बिडी यापासून दूर राहावे. अन्यथा परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. हे सर्व प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक आहेत, परंतु अस्वस्थता वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.


 


 


(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)