'हा खेळाडू फक्त IPL खेळण्यासाठी फिट', सोशल मिडीयावरून team India चा खेळाडू ट्रोल

Team India:  भारताचा सुपरस्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. यानंतर चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली असून त्याला निवृत्तीचा सल्ला दिला आहे.

Updated: Oct 4, 2022, 12:06 PM IST
'हा खेळाडू फक्त IPL खेळण्यासाठी फिट', सोशल मिडीयावरून team India चा खेळाडू ट्रोल title=

Team India : भारतीय संघाचा (team india) वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah ) दुखापतीमुळे 2022 च्या T20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. त्यामुळे चाहत्यांना आणि भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. डावाच्या सुरुवातीला बुमराहने किलर गोलंदाजी केली. T20 विश्वचषकातून बाहेर पडल्यामुळे बुमराहला चाहत्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले. चाहत्यांनी त्याला निवृत्ती होण्याचा सल्ला दिला आहे. (jasprit bumrah ruled out from t20 world cup 2022 due to injury fans brutally troll give advice retirement)

बुमराह T20 विश्वचषकातून बाहेर

जसप्रीत बुमराह वारंवार स्ट्रेस फ्रॅक्चरच्या दुखापतीशी झुंज देत आहे. पाठीच्या खालच्या भागातील  फ्रॅक्चरमुळे गेले सहा महिने जसप्रीत बुमराह बाहेर होता. परिणामी 2022 नंतरही बुमराहला टी-20 विश्वचषक खेळणे कठीण वाटत आहे.

चाहते संतापले

जसप्रीत बुमराह 2022 च्या टी20 विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर चाहते प्रचंड संतापले. ट्विटरवर चाहत्यांनी बीसीसीआय आणि बुमराहला ट्रोल करण्यास सुरुवात केली. बुमराह मागील काही महिन्यांपूर्वी गंभीर दुखापतीशी झुंज देत होता, अशा परिस्थितीत त्याला दुखापतीमुळे पुन्हा एकदा संघाबाहेर जाताना चाहत्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी बुमराहला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एक चाहत्याने त्याला ट्रोल करत लिहिले की, “यार जसीला कपड्यात झाकून ठेवा, त्याला कोणती दुखापत व्हायला नाही पाहिजे”  बुमराहने यावर्षी भारतासाठी केवळ 5 टी-20 सामने खेळले आहेत. त्याच वेळी, आयपीएलमध्ये (IPL) त्याने 14 सामने ब्रेकशिवाय खेळले. यानंतर एका चाहते त्याला निवृत्तीचा सल्लाही दिला.

 जसप्रीत बुमराह त्याच्या वेगवान गोलंदाजीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. त्याने भारतासाठी 60 टी-20 सामन्यात 70 विकेट घेतल्या आहेत. बुमराहशिवाय भारताचा रवींद्र जडेजाही दुखापतीमुळे t20  विश्वचषकातून बाहेर पडला आहे.