मुंबई : त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी आणि उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांवरही कोरफड अतिशय प्रभावी ठरते. कडक ऊन, प्रदूषण यामुळे त्वचेतील नैसर्गिक ऑईल कमी होते. त्यामुळे त्वचा टॅन होऊ लागते. या सर्व समस्यांवर बहुगुणी कोरफड लावणे फायदेशीर ठरते. बाजारात अनेक प्रकारच्या कोरफड जेल उपलब्ध आहेत. पण अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरीही कोरफड जेल बनवू शकता. त्यामुळे त्वचेला ओलावा मिळतो. 


कोरफड जेल बनवण्यासाठी लागणारे साहित्य-


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    कोरफडीची २-३ पाने ( ती कापून त्यातील आतील गर काढून घ्या.)

  • १ चमचा वॅक्स

  • ३ चमचा खोबरेल तेल किंवा जोजोबा ऑईल

  • २-३ थेंब इसेंशिअल ऑईल

  • १ चमचा व्हिटॉमिन ई ऑईल

  • मिक्स करण्यासाठी १ चमचा आणि लोशन ठेवण्यासाठी एक बाटली


बॉडी लोशन बनवण्याची पद्धत-


  • डबर बॉयलर पद्धतीने तेल आणि वॅक्स गरम करा.

  • त्यानंतर ते एका भांड्यात काढून घ्या.

  • थंड होऊ द्या.

  • त्यात इसेंशिअल ऑईल आणि व्हिटॉमिन ई घाला.

  • त्यानंतर ब्लेंडर किंवा व्हिस्करच्या मदतीने ते नीट मिक्स करा. हळूहळू ब्लेडिंग सुरु करा. त्यानंतर त्यात कोरफड जेल घालून व्यवस्थित मिक्स करा. मिक्स करताना त्यात कोणतही गुठळी राहणार नाही याची काळजी घ्या.

  • आता हे मिश्रण एका बॉटलमध्ये काढून थंड होऊ द्या. तुम्ही हे फ्रीजमध्येही ठेऊ शकता.


नोट- मात्र हे लोशन कमी प्रमाणातच बनवा कारण ते अधिक काळ टिकणार नाही. हे तुम्ही १५ दिवसांकरता फ्रिजमध्ये ठेऊ शकता.