नाकातील अनावश्यक केसांंना दूर करतील हे उपाय
अनेकदा नाकातील केस तुम्हांला सौंदर्याच्या दृष्टीने नकोसे वाटत असले तरीही आरोग्याच्यादृष्टीने ते अधिक फायदेशीर आहेत.
मुंबई : अनेकदा नाकातील केस तुम्हांला सौंदर्याच्या दृष्टीने नकोसे वाटत असले तरीही आरोग्याच्यादृष्टीने ते अधिक फायदेशीर आहेत. नाकातील केसांमुळे हवेमधील प्रदूषण, धूळ, धूर थेट फुफ्फुसांपर्यंत पोहचत नाहीत. मात्र वाढलेले केस नाकाबाहेर आल्यास ते खराब दिसतात. मग अशा नाकातील केसांपासून कशी मिळवाल सुटका?
इलेट्रिक शेव्हर
बाजारात शरीरावरील अनावश्यक केसांपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे इलेक्ट्रिक शेवर. पुरूषांना शेव्हिंगप्रमाणेच नाकातील केसांना ट्रीम करण्यासाठीदेखील त्याचा फायदा होतो.
कात्री
कात्रीच्या मदतीनेही नाकातील केस ट्रीम करता येऊ शकतात. हा एक सुरक्षित उपाय आहे मात्र नाकात कात्री वापरताना काळजी घ्या.
वॅक्सिंग
नाकातील केस काढण्यासाठीदेखील खास प्रकारच्या वॅक्सिंगचा पर्याय उपलब्ध आहे. शरीराप्रमाणेच नाकातील केस कमी करण्यासाठीदेखील पार्लरमध्ये अशाप्रकारचे वॅक्सिंग उपलब्ध असते.
लेजर ट्रीटमेंट
नाकातील केस सतत ट्रीम करण्याचा तुम्हांला कंटाळा येत असल्यास लेझर हेअर रिडक्शन ट्रीटमेंट मदत करते. मात्र यासाठी तज्ञांची मदत घ्या. अन्यथा हा पर्याय त्रासदायक ठरू शकतो.