मुंबई : मुलं जशी वाढतात तशी त्यांची हाडं मजबूत होण्यासाठी, शरीराची,मेंदूची पुरेशी वाढ होण्यासाठी आहाराची पथ्यपाणी सांभाळणंदेखील गरजेचे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आहारात सार्‍या आवश्यक घटकांचा समावेश करण्यासाठी आई प्रयत्नशील असते. अशावेळी नाचणी ही अत्यंत पौष्टिक आहे. मग त्याचा अधिक स्मार्टपणे वापर करण्यासाठी अशाप्रकारे त्याचा आहारात समावेश करा.  


नाचणीची खीर - भाजलेल्या नाचणीची कूट करून ठेवा. त्याला दूधामध्ये उकळा. या मध्ये साखर, सुकामेवा,बेदाणे मिसळा. ही खीर झटपट तयार होते.  


नाचणीचा उपामा - नाचणीचा उपमा देखील झटपट तयार होतो. नेहमीच्या उपम्याप्रमाणे तेलाच्या फोडणीमध्ये आवडीनुसार भाज्या मिसळा. केवळ रव्याऐवजी तुम्ही भाजलेल्या नाचणीचा कूट मिसळू शकता. 


नाचणीची भाकरी - सकाळी चपाती करत असाल तर रात्रीच्या जेवणामध्ये नाचणीच्या भाकरीचा समावेश करा. यामुळे त्यांना जेवणात व्हरायटीदेखील मिळेल.  


नाचणीचे लाडू - सुकामेवा आणि गूळ मिसळून नाचणीचे लाडूदेखील बनवले जातात. हिवाळ्याच्या दिवसात सतत भूक लागते. अशावेळेस मधल्या वेळेस खाण्यासाठी नाचणीचे लाडू हा हेल्दी पर्याय आहे.