मुंबई : वाढत्या प्रदुषणामुळे राजधानी दिल्लीतील नागरिकांचा श्वास गुदरमरल्याची बातमी ताजी असतानाच, राज्यातील जिल्हा चंद्रपूरही अतिप्रदुषीत झाल्याची बातमी आली. त्यामुळे थोड्याफार फरकाने प्रदुषणाची समस्या सर्वत्रच किती भयानक पद्धतीने वाढत आहे याची जाणीव आता होऊ लागली आहे. अशा वेळी मुलांचे आरोग्य सांभाळणे फार महत्त्वाचे आहे. म्हणूच ही काही माहिती आणि टीप्स...


प्रदुषणामुळे होणाऱ्या समस्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- वायुप प्रदुषणामुळे मुलांना दम्याचे विकार होतात.
- श्वासांचे अनेक विकार होण्याचाही धोका.
- फुफ्फुसावरही मोठा परिणाम
- त्वचेची अॅलर्जी


प्रदुषणापासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्याल?


- वातावरणात धुके, धुरके, धूर आदिंचे प्रमाण अधिक असेल तर, त्यांना मैदानात खेळण्यासाठी पाठवू नका.
- मुलांना सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यास न्या.
-घराबाहेर पडताना मास्क आणि हॅन्डग्लोजचा वापर करा.


प्रदुषणपरिसरात या पदार्थांचे सेवन करा


- मुलांना सर्दी, खोकला आदी विकार झाले असतील तर प्रदुषण परिसरात श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. अशा वेळी एक चमचा मधामध्ये आल्याचा रस मिसळून ते मुलांना प्यायला द्या.
 - योग्य प्रमाणात मुलांना लसूणही खायला द्या. लसणामुळे मुलांची प्रतिकारशक्ती वाढते. लसूण खाल्ल्यावर मुलांना पाणी प्यायला द्या.
 - मुलांच्या अहारात व्हिटॅमिन 'सी'चा समावेश असेल असे पदार्थांची वाढ करा. त्यासाठी मुलांच्या अहारात आवळा, संत्री, लिंबू, पेरू आदी फळांचा समावेश ठेवा.