मुंबई : आजची तरुणाई फॅशन ट्रेंड खूप फॉलो करते. बॉलीवूड सेलिब्रिटी पाहिल्यानंतर बहुतेक तरुण फॅशन ट्रेंड फॉलो करतात. आजकाल शूजखाली स्टॉकिंग्ज न घालण्याची फॅशन झालीये. तरुण पिढीतील बहुतेक लोक मोजेशिवाय शूज घालतात. मात्र, या फॅशन ट्रेंडमुळे तुमच्या शरीराला इजा होऊ शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र तुम्हाला माहितीये का, मोज्याशिवाय शूज घालणं धोकादायक ठरू शकतं. एका शोमध्ये याचा खुलासा झाला आहे. पावसाळ्यात अनेक पाण्यात भिजल्यानंतर शूज भिजतात आणि जर तुम्ही ते शूज जास्त वेळ घालत राहिल्यास त्रास होऊ शकतो.


संसर्ग होऊ शकतो


एका संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, मोजे घातल्याशिवाय शूज परिधान केल्याने पुरुषांमध्ये फंगल इन्फेक्शनचा धोका खूप वेगाने वाढत आहे. एका व्यक्तीला साधारणपणे एका दिवसात 300 मिली घाम येतो. घाम आणि आर्द्रतेमुळे बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढतो. जास्त घाम येणे आणि पायात ओलावा आल्याने त्याचे परिणाम खूप वाईट होऊ शकतात.


संशोधनात कार वॉशचे काम करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं, त्याच्या कामामुळे त्याचे पाय संपूर्ण वेळ ओले होते. त्यामुळे त्यांना बुरशीजन्य इन्फेक्शन झालं. त्याच्यावर अनेक महिने उपचारही झाले, त्यानंतर तो पूर्णपणे बरा झाला.


फॅशन आणि सुंदर दिसण्यासाठी लोक काहीही करण्यास तयार असतात, परंतु नेहमीच सर्वात आधी त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आजच्या काळात स्टाइलला खूप महत्त्व आहे, त्यामुळे काही गोष्टी लक्षात ठेवून हा इन्फेक्सन टाळता येऊ शकतं. आवश्यक नसल्यास मोजे घातल्याशिवाय शूज घालू नका. तसंच, शूज घालण्यापूर्वी तुमच्या पायाच्या तळव्यावर antiperspirant Spray करा.