नवी दिल्ली : तुम्ही स्त्री असा किंवा पुरूष. त्याने काही फरक पडत नाही. कारण, कमरेवर घट्ट पट्टा (बेल्ड) बांधण्याची सवय केवळ पुरूषालाच किंवा केवळ स्त्रीलाच असत नाही. ही सवय आपल्यापैकी बहुतांश मंडळींना असते. पण, सावधान. तुम्हाला जर ही सवय असेल तर. दैनंदिन जीवनातील अत्यंत सर्वसामान्य अशी ही सवय तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. कोरियात झालेल्या एका संशोधनात पुढे आले आहे की, ही सवय असणाऱ्या मंडळींच्या शरीरातील ब्डॉमिनल मसल्सची काम करण्याची पद्धत बदलते. कमरेवरती पट्टा घट्ट बांधल्याने पाठीच्या कण्यालाही समस्या निर्माण होतात. सोबतच तुमच्या एकूण शरीरावर परिणाम होऊन त्याचा भार गुडघ्यांच्या सांध्यावर पडतो. ज्यामुळे ज्वाईंट पेनची समस्या वाढते. 


पट्टा घट्ट बांधण्याचे काय आहेत तोटे?


- दीर्घ काळ पट्टा घट्ट बांधल्याने पेल्विक रीजनमुळे धमन्या, शिरा, आतडे आणि हृदयावरही दबाव वाढतो. ज्याचा परिणाम पुरूषातील स्पर्म काऊंट कमी होण्यावर वाढतो. त्याचा परिणाम पुरूषांच्या फर्टीलिटीवर होतो.
- अपचनाचा त्रास वाढतो.
- अॅसिडीटीचा त्रासही वाढतो. पण, तो हळूहळू वाढत असल्याने त्याचा एकदम प्रभाव दिसत नाही.
- पायांच्या हाडांवर अतिरीक्त भार.
- कंबरदुखीचा त्रासही संभवतो.