Weight According Height:  सध्याच्या घडीला फीट (Fit) आणि निरोगी राहणं हे एक आपल्यासाठी मोठं आव्हान बनलं आहे. आजकालच्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) सर्वांचा एकच प्रश्न असतो, तो म्हणजे वजनात होणारी वाढ (Weight gain). अयोग्य आहार (Wrong Diet) आणि बदलती जीवनशैली यामुळे लठ्ठपणाची समस्या काही आपली पाठ सोडत नाही. अनेकदा पुरुषांच्या तुलनेत महिलांना वजनाची समस्या अधिक भेडसावते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वजन कमी करण्यासाठी महिला अनेक टिप्सचाही वापर करतात. महिलांची कंबर, हिप्स आणि पोटाची चरबी वाढली की त्यांना ते आवडत नाही. बर्‍याच वेळा महिला हेवी वर्कआउट आणि डाएट कंट्रोल या माध्यमातून वजन कमी करतात. पण फार कमी लोकांना माहिती असतं की, उंचीनुसार त्यांचं किती वजन असलं पाहिजे (Weight According Height). 


उंचीनुसार वजनाचा समतोल असला पाहिजे


आपल्यासाठी हे जाणून घेणं महत्वाचं आहे की, निरोगी व्यक्तीचं वजन, वय आणि उंची किती असावी. तज्ज्ञांच्या मते, उंचीनुसार वजनाचा समतोल हा उत्तम आरोग्याचा निकष आहे. यासाठीच आज आम्ही तुम्हाला तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन किती असावं याबाबत माहिती देणार आहोत. 


पहा उंचीप्रमाणे वजन किती असावं


  • 4 फूट 10 इंच उंची असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन 41 ते 52 किलो असावं. यापेक्षा जास्त वजन ओव्हरवेटच्या श्रेणीमध्ये येतं.

  • 5 फूट उंचीच्या व्यक्तीचं सामान्य वजन 44 ते 55.7 किलो दरम्यान असावं. हे निरोगी शरीराचं लक्षण आहे.

  • 5 फूट 2 इंच उंच असलेल्या व्यक्तीचं हे वजन 49 ते 63 किलो दरम्यान असावं.

  • 5 फूट 4 इंच उंच असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन 49 ते 63 किलो दरम्यान असावं.

  • 5 फूट 6 इंच उंच असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन 53 ते 67 किलो दरम्यान असलं पाहिजे.

  • 5 फूट 8 इंच उंच असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन 56 ते 71 किलो दरम्यान असलं पाहिजे

  • 5 फूट 10 इंच उंच असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन 59 ते 75 किलो दरम्यान असावं.

  • 6 फूट उंच व्यक्तीचं सामान्य वजन 63 ते 80 किलो दरम्यान असावं.