शरीरसंबंधांमुळं वजन वाढतं? पोटासह मागचा भाग खूप वाढतो, हा समज खरा की खोटा?
Weight Gain After Marriage : शारीरिक संबंध ठेवल्यानंतर वजन वाढतं का? पोटासह मागचा भाग खूप वाढतो. दररोज सेक्स केल्यामुळे वजन झपाट्याने वाढतं. महिला जाड तर पुरुष बारीक होतात, हा समज खरा की खोटा? काय आहे यामागचं सत्य आज आपण जाणून घेणार आहोत.
Weight Gain After Physical relationship : आपण ऐक वेळा आपल्या आजूबाजूला ऐकलं आहे. काय लग्न झाल्यानंतर तुझं वजन वाढलं आहे. अनेक महिला याचा थेट संबंध शारीरिक संबंधाशी जोडतात. रोज सेक्स केल्यामुळे वजन वाढतं. अनेक महिलांचा पोटाचा आणि मागचा भाग अचानक जास्त वाढतो. या सगळ्याचा संबंध सर्रास सेक्सशी जोडला जातो. पण यामागे खरंच काय तथ्य आहे त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
शारीरिक संबंधानंतर महिलाचं वजन वाढतं तर पुरुष बारीक होतात असा समज आहे. खरं तर समाजात आजही लैंगिक संबंधाबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. लग्नानंतर सेक्शुअल रिलेशनशिपमुळे वजन वाढतं का? असे प्रश्न आजही विचारले जातात.
तज्ज्ञ काय म्हणतात ?
खरं तर सेक्स केल्यामुळे वजन वाढतं नाही. याबद्दल कुठलाही पुरावा नाही. पण सेक्शुअल रिलेशनशिपमुळे वजन अजिबात वाढत नाही. हा एक गैरसमज असल्याचं म्हटलं आहे. डॉ. पारस शाह यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार ते म्हणतात ''लैंगिक संबंध ठेवल्यानंतर महिलेच्या वजनात बदल होईल इतकी सक्षमता त्यात मुळीच नसते.'' ''या उलट एकदा शारीरिक संबंध ठेवल्यास जवळपास अडीच कॅलरी कमी होतात.''
याचा अर्थ सेक्स हा एक उत्तम वर्कआउट पर्याय मानला जातो. त्यामुळे हा गैरसमज अतिशय चुकीचा आहे की लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवल्यामुळे वजन वाढतं. पण हो सेक्स हार्मोन्समधील बदलामुळे वजन वाढू शकतं.
" शारीरिक संबंध आणि हिप्स वाढण्याचाही काहीही संबंध नाही. तज्ज्ञ सांगतात की, पोट सुटलं, नितंब, कंबर, मांड्या वाढल्या यामागे शारीरिक संबंध हे कारण असल्याचा गैरसमज मनातून काढून टाकायला पाहिजे.'' तज्ज्ञ सांगतात की, महिलांमध्ये वयानुसार स्नायू बदलतात. त्यामुळे आपल्या वजनावर परिणाम होतो. महिलांच्या शरीरातील इस्ट्रोजेन या हार्मोनमुळे हिप्स मोठे होतात.
या सगळ्यामागे हार्मोनल बदल आणि लग्नानंतर बदलेली जीवनशैली, मग त्यात तुमची अपुरी झोप, खाण्यापिण्यामधील बदल असे अनेक कारणं असतात. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे गर्भधारणेमुळे महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्यामुळेही महिलांच्या वजनामध्ये फरक पडतो.
सेक्स हार्मोन्स असंतुलित होण्यामागील कारणं
आपल्या शरीरात एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन आणि डीएचईऐ ही सेक्स हार्मोन्स आहेत. शारीरिक संबंधानंतर महिलांच्या शरीरात सेक्स हार्मोन्स असंतुलित होतात. यामागे अनेक कारणं असतात. त्यात जेनेटिक्स, डाएट, लाइफस्टाइल, तणाव ही मुख्य कारणं तज्ज्ञ सांगतात.
सेक्स हार्मोन्ससोबत महिलांचे वजन वाढण्याचे अजून एक मोठं कारण पीसीओडी किंवा प्रीमॅच्युर पेरिमीनॉपॉझ ही आहेत. त्यामुळे लग्नानंतर महिलांचे वजन झपाट्याने वाढल्यास त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
'या' गोष्टींची काळजी घ्या!
लग्नानंतर आहाराकडे विशेष लक्ष द्यावे.
जंक फूड आणि तळलेले, मसालेदार पदार्थ कमी खावे.
पुरेशी झोप घ्यावी.
ताण तणाव, नैराश्य आणि डिप्रेशन या गोष्टींना बळी पडू नयेत.
नियमित व्यायाम किंवा योगा करावा.
हार्मोन्स संतुलित राहण्यासाठी हेल्दी लाइफस्टाइल पाळावी.
वेळीवेळी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी.