Weight Gain : कमी केल्यानंतर का होतेय पुन्हा वजनात वाढ? जाणून घ्या कारणं
वजन कमी केलंय आणि तरीही तुमच्या वजनात वाढ होतेय तर त्यामागे खालील कारणं असू शकतात
Weight Gain : वजन घटवणं (Weight loss) एक खूप कठीण काम आहे. मुख्य म्हणजे वजन कमी करण्यासाठी योग्य पद्धत वापरली तरच ती फायदेशीर ठरते. मात्र यापेक्षाही कठीण काम असतं ते कमी केलेलं वजन मेंटेन ठेवणं. कारण अनेकदा वजन कमी केल्यानंतर देखील वजन पुन्हा वाढू लागतं. मात्र यामागे अनेक कारणं आहेत. जाणून घेऊया यामागील कारणं
जर तुम्ही वजन कमी केलंय आणि तरीही तुमच्या वजनात वाढ होतेय तर त्यामागे खालील कारणं असू शकतात
वेटलिफ्टिंग एक्सरसाइज करणं सोडून देणं
वजन कमी करण्यासाठी लोक वेटलिफ्टिंगचे व्यायाम करतात. कारण यामुळे शरीराची चयापचय वाढते आणि शरीरातील फॅट बर्न होतात. परंतु, वजन कमी झाल्यानंतर वेटलिफ्टिंग सोडलं तर शरीराचा चयापचय दर कमी होऊ लागतो. आणि शरीरात पुन्हा फॅट्स जमा होतात. त्यामुळे वजन कमी झाल्यानंतरही, आठवड्यातून 3-4 दिवस वेटलिफ्टिंग केलं पाहिजे.
जुन्या सवयी पुन्हा सुरु होणं
लोकं वजन कमी होताच, त्यांच्या जुन्या आणि वाईट सवयी सुरू करतात. ज्यामध्ये गोड, जंक फूड, मद्यपान किंवा धूम्रपान इ. जेव्हा आपण पुन्हा चुकीच्या सवयींचा अवलंब करता तेव्हा आपलं वजन पुन्हा वाढू लागतं.
कुटुंबिय आणि मित्रपरिवाराच्या सवयींचा परिणाम
तुमच्या सवयींबरोबरच, जवळपास राहणारे मित्र आणि कुटूंबाच्या सवयीमुळे आपल्या आरोग्यावरही परिणाम होतो. जेव्हा तुम्ही कुटुंब आणि मित्रांच्या चुकीच्या सवयींमध्ये राहता तेव्हा तुम्हीही त्या सवयी स्विकारता. उदाहरणार्थ, जर आपल्या घरात प्रत्येकाला मिठाई खाण्याची सवय असेल तर मिठाई खाण्याची तुमची शक्यता वाढते.
पुरेशी झोप न घेणं
तुम्ही वजन कमी करत आहात किंवा तुमचं वजन कमी झालं असेल परंतु पुरेशी झोपं घेणं महत्त्वाचं आहे. जर तुमचं शरीर पुरेशी झोप घेत नसेल तर तुम्हाला थकल्यासारखं वाटेल आणि चयापचय दर कमी होईल. ज्यामुळे आपल्या शरीरात चरबी बर्न करण्याची क्षमता कमी होईल.
ब्रेकफास्ट न करणं
जर तुम्ही ब्रेकफास्ट करणं टाळत असाल किंवा योग्य ब्रेकफास्ट करत नसाल तर तुमचं वजन पुन्हा वाढू शकतं. नाश्त्यामध्ये निरोगी आणि फायबर समृद्ध अन्न खाल्ल्याने तुमचे पोट बराच वेळेस भरलेलं राहतं आणि आरोग्यासाठी अयोग्य खाणं खाण्याची शक्यता कमी करतं.