Weight Gain: खजुर खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते, दिवसात कधी आणि किती सेवन कराल? जाणून घ्या
Weight Gain: वजन कमी असणे ही खूप मोठी समस्या असल्याचे अनेकांना वाटते मग ज्यांना त्यांचं वजन वाढवायचं असेल त्यांनी खाली दिलेल्या पद्धतीनं खजूरचे सेवन करावे.
मुंबई : खजूर (dates) खाण्यास चविष्ट असतात त्यापेक्षा जास्त ते पोषक असतात. जे लोक खजूराचे सेवन करतात, त्यांच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. खजूरमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, हेल्दी फॅट, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम यांसारखे पोषक घटक चांगल्या प्रमाणात असतात. (Weight increases) ज्यांच्यामध्ये कॉपर, झिंक, आयरन आणि फॉस्फरसची कमतरता आहे, त्यांनी खजूराचे सेवन करायला हवे. पण तुम्हाला माहीत आहे का की, वजन वाढवण्यासाठी खजूर खाणे खूप फायदेशीर आहे. चला जाणून घेऊयात वजन वाढवण्यासाठी खजूर खाण्याची योग्य वेळ कोणती आणि किती प्रमाणात खाऊ शकतो... (Weight Gain)
वजन वाढवण्यासाठी या वेळी खजूरचे सेवन करा
वजन वाढवण्यासाठी खजूर हा खूप चांगला आहार आहे. वर्कआउट करण्यापूर्वी 30-60 मिनिटे खजूर खा. तुमची इच्छा असेल तर तुम्ही रात्रीही ते खाल्ल्यानंतर झोपू शकता. ज्या लोकांना त्यांचे वजन वाढवायचे आहे त्यांनी सकाळी खजूर खाऊ नये कारण त्यात भरपूर फायबर असते ज्यामुळे तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही. पण जर तुम्ही फक्त निरोगी राहण्यासाठी याचे सेवन करत असाल तर सकाळी खजूर खावे. ज्या लोकांना अशक्तपणा वाटतो ते नाश्त्यात खजूर खाऊ शकतात.
एका दिवसात इतक्या खजूर खाणे योग्य आहे
ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनी दिवसातून 7 ते 8 खजूर खावेत. एका खजुरात सुमारे 20 कॅलरीज असतात, त्यामुळे तुम्हाला एकूण 240 कॅलरीज मिळतील. ज्यांना पोटाच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी खजुराचे सेवन खूप फायदेशीर आहे. हे खाल्ल्याने तुमची पचनक्रिया सुधारते. (Weight increases rapidly by eating dates consum this much in a day is beneficial)
अशा प्रकारे खा खजूर
वजन वाढवण्यासाठी रात्री खजूर खा. याशिवाय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खजुर हे दुधासोबतही खाऊ शकता. दूध आणि खजूर एकत्र खाल्ल्यानं वजन झपाट्याने वाढण्यास मदत होते. यासाठी दुधात खजूर टाकून त्याला उकळी येऊ द्या आणि नंतर सेवन करा.
हेही वाचा : Chanakya Niti : असा पैसा श्रीमंत व्यक्तीकडे टिकत नाही, जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीति
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)