Weight loss: आता तुमचे आवडीचे पदार्थ खाऊनही होऊ शकतं तुमचं वजन कमी; डाएटचा `हा` नियम पाळा
Weight loss: वजन कमी करताना अनेकदा डाएट फॉलो करायचं म्हणून आपल्याला नावडीचे पदार्ख खावे लागतात. मात्र आता असं होणार नाही. तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ खाऊन देखील वजन कमी करू शकता.
Weight loss: आजकाल आपल्यापैकी अनेकजण वजन कमी (Weight loss) करण्यावर भर देतात. वजन कमी (Weight loss) करण्यासाठी आपण ना-ना पद्धतीचा अवलंब करतो, मात्र तरीही अनेकदा वजनात घट होताना दिसत नाही. आपल्या मनात गंमतीने असा विचारही येतो की, आपल्या आवडीचे कितीही पदार्थ खाल्ले आणि तरीही आपलं वजन (Weight) वाढलंच नाही, तर किती बरं होईल. मात्र तुम्हाला जसं वाटतंय, तसं खरंच घडणार असेल तर.
आज आम्ही तुम्हाला अशा एक डाएटची माहिती देणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थही खाऊ शकता आणि तुमचं वजनंही कमी होईल. तुम्हाला ही गोष्ट खोटी वाटेल, मात्र खरंच असं डाएट आहे. 80/20 असा या डाएटचा रूल आहे.
डाएटचा 80/20 नियम काय सांगतो?
वजन कमी करण्यासाठी आपण सगळे डाएट तर करतो. मात्र 80/20 हा नियम काय आहे, हे फार कमी लोकांना माहिती असेल. डाएटच्या या नियमानुसार, याअंतर्गत तुम्हाला 80 टक्के पौष्टिक आहार आणि 20 टक्के तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ खाऊ शकता.
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, या डाएटचा नियम तुम्हाला फॉलो करताना कॅलरीज तसंच कार्ब्स काऊंट करण्याची देखील गरज नाहीये. त्यामुळे या नियमानुसार, तुम्ही केवळ डाएट फूड न खाता तुमच्या आवडीचे पदार्थही खाऊ शकता.
कसा फॉलो कराल 80/20 डाएटचा नियम?
हे डाएट करताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, तुम्ही तुमच्या आहारामध्ये विविध रंगाच्या भाज्यांचा अधिक समावेश केला पाहिजे. तसंच ज्या भाज्यांमुळे पचनक्रिया सुधारेल अशा भाज्यांचा आणि फळांचा तुमच्या आहारात समावेश करावा. यामध्ये सिझनल भाज्या आणि फळांचा सामवेश व्हायला हवा.
80 टक्के डाएटमध्ये काय समाविष्ट कराल?
पौष्टिक आहारामध्ये तुम्ही भाज्या, फळं, मासे आणि चिकन यांचा समावेश करू शकता. त्याचप्रमाणे, डेअरी प्रोडक्ट्सचाही तुम्ही समावेश यामध्ये करू शकता. वजन कमी करण्यासाठी तुम्ही फॅट फ्री दुधाचा वापर करू शकता.
आवडीच्या गोष्टींमध्ये कशाचा समावेश कराल?
यामध्ये तुम्ही त्या खाद्यपदार्थांचा समावेश करावा, जे तुम्हाला भरपूर आवडतात. यामध्ये सॅच्युरेडेट फॅट, रेड मीट, अल्कोहोल, रिफाईंड कार्ब्स तसंच साखरयुक्त पदार्थांचा समावेश करू शकता. यामध्ये तुम्हाला अचानक रात्रीच्या वेळेस तुम्हाला गोड काही खावंसं वाटू शकतं. मात्र हे खाताना त्याच्या प्रमाणात कधीही वाढ होणार नाही, याची काळजी घ्या.