पालापाचोळा नव्हे, गुणकारी पानं वापरून तयार केलाय हा Juice; वजन कमी करण्याचा रामबाण उपाय
सध्या अनेकांच्या तोंडी एकच सूर पाहायला मिळतो. हा सूर असतो `वजन वाढलंय.... काहीही करुन ते कमी करायचंय.` या काहीही करायचंयमध्ये मग व्यायामाचा समावेश असतो, बऱ्याच अशा उपकरणांचा समावेश असतो ज्यांच्या जाहिरातींना आपण नकळतच भुलतो.
Weight Loss Juice: सध्या अनेकांच्या तोंडी एकच सूर पाहायला मिळतो. हा सूर असतो 'वजन वाढलंय.... काहीही करुन ते कमी करायचंय.' या काहीही करायचंयमध्ये मग व्यायामाचा समावेश असतो, बऱ्याच अशा उपकरणांचा समावेश असतो ज्यांच्या जाहिरातींना आपण नकळतच भुलतो. इतके सारे उपाय करुन पाहिल्यानंतर हाती येणारी निराशा पाहून मनस्ताप होतो. पण, मुळात हा मनस्तापही होणार नाही, जर तुम्ही कढीपत्त्याचा रस प्यायलात. सहसा जेवणात वापरल्या जाणाऱ्या या पदार्थाची मदत वजन घटवण्यात, केसांचं सौंदर्य खुलवण्यातही होते. बऱ्याच आजारांवर कढीपत्ता रामबाण उपाय म्हणून काम करतो.
कढीपत्त्याच्या (Curry leaves) रसाचेही अनेक फायदे आहेत. यातला सर्वात मोठा फायदा म्हणजे शरीरातील हानिकारक चरबी घटवणं. तुम्हीही वजन कमी करण्यासाठी आटापिटा करत असाल, तर कढीपत्त्याचा रस तुम्हाला बरीच मदत करेल. यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल (Cholesterol), ट्राइग्लिसराइडचं प्रमाण कमी होतं.
डायबिटीज (Diabetes)चा त्रास असणाऱ्यांनी दररोज हा रस घेतल्यास त्यांच्या रक्तातील साखर नियंत्रणात येते. आरोग्यही सुधारतं. कढीपत्त्याच्या रसाचा आणखी एक फायदा म्हणजे, यामुळे पचनशक्तीत सुधारणा होतात.
अधिक वाचा : पालक की मेथी, तुमच्या आरोग्यासाठी जास्त फायदेशीर कोणती भाजी,जाणून घ्या
कढीपत्ता शरीराच्या दृष्टीने Ditox म्हणून काम करतो. याच्या सोवनामुळे शरीरातील हानिकारत घटक बाहेर पडतात. तुम्ही अगदी दररोज कडीपत्त्याची दोन दोन पानं चघळली तरी तुम्हाला याचा सकारात्मक फायदा दिसून येईल.
कसा तयार कराल कढीपत्त्याचा Juice?
- कढीपत्त्याची पानं घ्या आणि ती पाण्यात उकळा
- काही वेळानंतर गॅस बंद करा आणि या पाण्यात लिंबाचा रस, मध मिसळा.
- हा ज्युस तुम्ही चहाप्रमाणे प्या.
- शक्य असल्यास ज्युस उपाशीपोटीच प्या.
- व्यायाम करण्याआधी अर्ध्या तासापूर्वीही तुम्ही हा ज्युस पिऊ शकता.
(वरील माहिती सर्वसामान्य माहितीच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)