मुंबई : उन्हाळ्यात इतर ऋतूंच्या तुलनेत खाणे कमी होते. यादरम्यान पातळ पदार्थांचे सेवन अधिक केले जाते. यासोबत उन्हाळ्यात झोपही कमी होते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हा ऋतू चांगला आहे. जर तुम्ही वजन कमी करण्याचा संकल्प केलाय. उन्हाळ्यात स्वत:ला फिट ठेवण्यासाठी लक्ष्य ठेवा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही पदार्थांचे सेवन उन्हाळ्यात केल्यास तुम्ही सहजरित्या वजन घटवू शकता. हे पदार्थ पाचनशक्ती सुधारण्यासोबतच पोटही भरतील. जाणून घ्या हे पदार्थ


सॅलड खाणे शरीरासाठी हितकारक असते. उन्हाळ्यात काकडी, टोमॅटो सारख्या पदार्थांचा सॅलडमध्ये समावेश करा. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरुन निघेल. सॅलडमुळे पोटही भरेल. तसेच जंक फूडपासून तुम्ही दूर राहाल. 


उन्हाळ्याच्या दिवसात दही, ताकाचे सेवन करावे. उन्हाळ्याच्या दिवसांत दह्याचे सेवन फायदेशीर ठरते. यामुळे पोषण मिळतेचय तसेच उन्हाळ्यात शरीराची काहिली होत नाही. तसेच वजनही घटण्यास मदत होईल. 


उन्हाळ्याच्या दिवसात गिलके, दुधी या भाज्यांचे सेवन करा. यामुळे वजन कंट्रोल होते. यामुळे पाचनशक्ती सुधारते. 


या दिवसांत खरबूज, कलिंगड या पाणीदार फळांचा समावेश करा. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. तसेच ज्यांना वजन कमी करायचे असेल तर आंब्यापासून दूर राहाल. 


तसेच लिंबू पाण्याचे सेवनही शरीरासाठी हितकारक मानले जाते. यामुळे शरीराला उर्जा मिळते. दरम्यान वजन कमी करायचे असल्यास लिंबू पाण्यात साखर मिसळण्याऐवजी मध टाका.