Weight Loss Rules : धावपळीच्या जगात आपल्या आरोग्यावर फारसे लक्ष नसते. भूक भागवण्यासाठी आपल्याला जे मिळतं ते आपण खातो. पण त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो हे मात्र आपण विसरतो. आहाराच्या बिघडलेल्या सवयी त्यातच स्वत:च्या जीभेवर नियत्रंण नसणं, या सर्व कारणांमुळे वजन मात्र वाढू लागलं. पण, आता याच झालेल्या चुका सुधारत तुम्ही वजन असगदी सहजपणे नियंत्रणात आणू शकता. पाहा त्या सोप्या सवयी... (Weight Loss Tips These 6 rules will help you lose weight easily nz)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. नाश्ता वगळू नका (do not skip Breakfast)
सकाळी उपाशी राहू नका. सकाळचा नाश्ता भरपोट केल्यास पुर्ण दिवस काम करण्याची ताकद तुम्हाला मिळते. त्या नाशत्यातून काम करायची चांगलीच उर्जा मिळते.


2.  तंतुमय पदार्थ खा (eat high fibre foods)
उच्च फायबरयुक्त  पदार्थांचा समावेश तुमच्या आहारात करा. शक्यतो तळलेले आणि स्टॉल वरील पदार्थ खाण्यास टाळा. विशेष म्हणजे घरचे जेवण खा. 


3. एक लहान ताट वापरा (use a smaller plate)
जेव्हा आपले ताट लहान असते तेव्हा आपल्या ताटात खूप कमी जेवण घेऊन ते संपवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपली भूक जितकी असते तितकेच जेवण आपण जेवतो. कधी कधी आपल्याला खायायचे नसते तरी आपण अधिक खातो कारण ताटातील अन्नाचा अपमान करायचा नसतो. 



Health Tips : सतत गोष्टी विसरताय? शरीरात अतिशय महत्त्वाचा घटक कमी होतोय, काळजी घ्या


4. दररोज व्यायाम करा (workout daily)


आपण सगळेच खूप व्यस्त असतो. पण किमान सकाळची 15 मिनिटे स्वत:साठी राखीव ठेवून दररोज व्यायाम करावा. व्यायामामुळे शरीराला फ्रेश वाटते. 


5. पुरेशी झोप घ्या (get enough sleep)
दररोज 8 ते 9 तासाची झोप घ्या. झोप घेताना हलगर्जीपणा करु नका. रात्री तुम्हाला लवकर झोपायची सवय लावली पाहिजे. पुरेशी झोप नसल्यामुळे ही आपले वजन वाढण्याची शक्यता जास्त असते.


6.  दोन घास कमी खा (Eat Less)
आपल्याला नेहमी सांगितले जाते की, दोन घास कमी खा. या नियमाचा वापर करा. जेव्हा आपण दोन घास कमी खातो तेव्हा शरीरात अन्नाची चयापचय क्रिया व्यवस्थित पार पडते. त्यामुळेच आपली पचनशक्ती चांगली होते.


आणखी वाचा - Relationship Tips: तुमचा पार्टनर तुम्हला चिट करतोय का? असं ओळखा


नेहमीच लक्षात ठेवा आपले शरीर हे आपल्याला वारंवार काही सुचना करत असते जेव्हा त्याचा आपण गांभीर्याने विचार करत नाही तेव्हा त्याचे परिणाम ही शरीर गंभीर देत असते. इथूनच वजन वाढण्याची समस्या सुरु होते. वाढलेले वजन कमी करणे अशक्य नाही पण त्यासाठी तुम्हाला काही नियम स्वत:साठी तयार केले पाहिजे आणि पालन देखील केले पाहिजे.


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)