मुंबई : वजन कमी करण्यासाठी लोकांचा आटापिटा सुरूच असतो, त्यात वाईट काहीच नाही, सातत्य फक्त असायला हवे, शिवाय योग्य मार्गदर्शनही फार महत्वाचं असतं. तुम्ही जेवढं मन लावून व्यायाम कराल, किंवा आहारात बदल कराल, नक्कीच तुम्ही निरोगी आणि जास्त वयातही कमी वयाची उर्जा नक्कीच अनुभवाल.


व्यायाम, डायटशिवाय वजन कसं कमी करणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्यायाम आणि योग्य डायटने वजन कमी होतंच. पण ज्यांना हे देखील जमत नाही, त्यांनी पुढील साधा सोपा काढा बनवून  रोज सकाळी ग्लासभर काढा प्यायला सुरूवात केली आणि वजन कमी होण्यास सुरूवात झाली, तर लॉटरीचं लागली म्हणायची ना आरोग्याची.


आता हा काढा कसा बनवायचा?


हा काढा अगदी साधा आहे, तुम्हाला तो रोज वापरता येईल. एक कप गरम पाण्यात रात्री एक चमचा ओवा, एक चमचा मेथीचे दाणे भिजवा. सकाळी हे पाणी गाळून घ्या, आणि रिकाम्या पोटी प्या.


फक्त एकच गोष्ट यात लक्षात ठेवा


या काढ्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास सुरूवात होईल, तसेच पोटाच्या समस्या देखील दूर होतील.या काढ्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी देखील कमी होते. फक्त एकच गोष्ट यात लक्षात ठेवा नाही तर वजन कमी होणे विसरा. 


सातत्य अतिशय महत्वाचे


कारण या गोष्टीत सातत्य असणे फारच महत्वाचे आहे. वर्षभर सातत्य ठेवल्यानंतर, आपले अनुभव दुसऱ्यांना सांगा. महिनाभर असे केल्यानंतरच तुम्हाला फरक लक्षात येईल. ओवा पोटाच्या आजारासाठी गुणकारी आहेत, यामुळे पचनशक्ती सुधारते, मेथीच्या दाण्यांमध्येही पौष्टीक आणि औषधी सत्व आहेत. चला प्लॅनिंग करा, ओवा आणि मेथी आणा, आणि सुरू करा रोज ग्लासभर काढा.