कुठल्या वयापासून मुलींनी ब्रा वापरावी? योग्य ब्रा कशी निवडायची?
Teenager Bra Tips : प्रत्येक मुलगी जेव्हा वयात येते तेव्हा तिला आणि तिच्या आईला प्रश्न पडतो नेमक्या कोणत्या वयापासून मुलीने ब्रा घालायला पाहिजे? तिची फर्स्ट ब्रा कशी अशाला हवी अशा अनेक प्रश्नांचं आज आपण निरासन करणार आहोत.
Teenager Bra Tips in marathi : घरात लक्ष्मी आली की एक वेगळाच उत्साह असतो. त्या छोट्या छोट्या पायातील पैंजण घरभर दुडूदुडू धावत असतात. पण जेव्हा ही चिमुकली वयात येते तेव्हा आईला चिंता होते तिच्या शरीरातील बदलाची. वयात आल्यामुळे तिच्या शरीरात बदल होत असतात. मुलीच्या स्तनात आता बदल होत असतात. अशावेळी आईला आणि मुलीला पहिला प्रश्न पडतो कोणत्या वयापासून मुलीला ब्रा घालण्यास सांगावी. तिच्यासाठी फर्स्ट ब्रा घेतना काय काळजी घ्यावी. मुलींना त्यांच्या आयुष्यातील या अविभाज्य घटक होणाऱ्या ब्रेसियरबद्दल संपूर्ण माहिती माहित असावी.
आज बाजारात असंख्य ब्रा उपलब्ध असतात. त्यामुळे नेमकी कुठली आणि कशा प्रकारची, कोणत्या कापड्याची ब्रा घेतली पाहिजे अशा अनेक प्रश्नांची उत्तर आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ठाण्यातील स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ज्ञ डॉ. अलका गोडबोले यांनी आपल्याला याबद्दल माहिती दिली आहे. (what age should girls use bra How to choose the right bra Tips in marathi)
डॉ. गोडबोले म्हणाले की, जेव्हा मुली वयाने मोठी होत जाते तेव्हा तिच्या ब्रेस्टच्या टिश्यूमध्ये असलेली कॅपस्युल ब्रेक होत जातात. त्यासोबत ब्रेस्ट ग्रोथला सुरुवात होते. या बदलामुळे अनेक मुलींना छातीत थोडं फार दुखतं, हे नार्मल आहे. जेव्हा हे दुखणं कमी होतं तेव्हा ब्रेस्टचा आकार वाढायला लागतो. डॉक्टर सांगतात या परिस्थितीत मुलींनी क्रॉप टॉप ब्रा परिधान केल्या पाहिजे. शिवाय त्याचं मटेरियल हे होजिअरी असल्यास त्यामध्ये मुली कमफर्टेबल राहू शकतात. साधारण 8 ते 10 वर्षांच्या मुलींना क्रॉप टॉप ब्रा घालण्यास हरकत नाही.
फर्स्ट ब्रा खरेदी करताना काय लक्षात ठेवावं?
पहिल्या वहिल्या ब्राची खरेदी करताना सगळ्यात आधी तिच कापड पाहावं. ब्रा ही कॉटन किंवा होजिअरी मटेरियलची असावी. बाजारात सिंथेटिक कापडाची फॅशनबेल ब्रा असल्याने त्या घेणं टाळा. आपल्या शरीरातील बदलासाठी ब्रेसियरचे कापड नेहमी सॉफ्ट असणं गरजेच आहे. जोपर्यंत ब्रेस्टी वाढ पूर्णपणे होत नाही तोपर्यंत क्रॉप टॉप ब्रा परिधान करणे हे उत्तम मानले जाते. त्याशिवाय ब्रा घेताना तिच्या फिटिंगकडे विशेष लक्ष द्या. त्यामुळे अशावेळी ट्रायल घेऊन चांगल्या दुकानातून ब्रा खरेदी करा. तुमची मुलगी हेल्दी असेल तर तिच्यासाठी ब्रेस्टला सपोर्ट मिळेल अशा ब्राची निवड करा.
ब्रा किती वेळ घालावी?
पहिल्यांदाच ब्रा घालत असाल किंवा कुठल्याही महिलेने ब्रा घालताना हा नियम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ब्रा ही 8 तास तुम्ही परिधान करु शकता आणि रात्रीच्या झोपताना ती काढून ठेवा.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)