Sugarcane Juice Benefits in Marathi: उसाचा रस आपल्याला सगळ्यांनाच आवडतो. आपल्या आरोग्यासाठी उसाचा रस फार (Sugarcane Juice) उपयुक्त ठरतो. उन्हाळ्यात आपल्याला काहीतरी थंड असं पेय प्यावेसे वाटते. पण आपल्या आरोग्यासाठी रोज रोज थंड कोल्डड्रीक (Colddrink) पिणं हे काही चांगले नसते त्यात अनेक प्रकारच्या गोष्टी समाविष्ट असतात. त्यामुळे कॉल्डड्रीक्सचे जास्त सेवन केल्यानं ते आपल्याला आरोग्यासाठी हानिकारकही ठरू शकते. तेव्हा नैसर्गिक घटकांचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करून घेऊ शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्याला अनेकदा अशावेळी नारळपाणी (Coconut Water) आणि उसाचा रसही पाव्यासा वाटतो तेव्हा अशावेळी अजिबात वेळ दवडवू नका आणि रस्त्यात कुठेही रसवंती गृह दिसले तर उसाचा रस प्यायला नक्की थांबा. 


काय आहेत गुणधर्म? 


आपल्याला उन्हाळ्यात एनर्जीची गरज असते तेव्हा उसाचा रस प्यायल्यानं आपल्याला तेवढी एनर्जी (Immunity) मिळते. यामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याची किमया असते. तुम्ही जर का रोज उसाच्या रसाचे सेवन केलेत तर तुम्हाला अनेक रोगांपासून मुक्तताही मिळू शकते. त्याचबरोबर यानं तुम्हाला कुठलं एनर्जी बुस्टिंग ड्रींकही घ्यायची गरज नाही. उसाचा रस हे स्वत: एका ओआरएसप्रमाणे काम करते. यानं डिहायड्रेशनही दूर होते.


उसाच्या रोपातून सॅकरम ऑफिशिनारम हा पदार्थ मिळते. तो खूपच गोड असतो. यामध्ये अनेक पोषक घटक असतात. यातून पचन सुधारते वर म्हटल्याप्रमाणे ताकद वाढवते. सोबतच मन शांत करायला आणि तणावमुक्त करायला मदत करते. हाडंही (Sugarcane Juice For Bones) मजबूत होतात. उसाच्या रसात फोटोप्रोटेक्टिव्ह असतात ज्यानं प्रतिकारशक्ती वाढते आणि तुम्हालाही चांगला आराम मिळतो. 


काय आहेत फायदे? 


उसाच्या रसामध्ये फायबर (Fiber), पोटॅशियम, फ्लेव्होनॉईड्स एन्टीऑक्सिडंट्स, साखर आणि कॅलरीज (Calories) असतात. उन्हाळ्यात अनेकदा आपल्याला लघवी होताना त्रास होतो त्यामुळे उसाचा रस प्यायल्यानंतर तुमचा हा त्रासही कमी होतो. त्वचेसाठी हा रस चांगला आहे. मधुमेह व्यक्तींसाठीही हा रस फायदेशीर ठरतो. 


याचा फायदा कावीळ (Liver) झालेल्या पेशंटसाठीही होतो. कारण उसाचा रस प्यायल्यानं तुमचं यकृतही ठीक राहते. उन्हाळ्यामध्ये अनेकांना डिहायड्रेशनचा त्रास होतो तेव्हा आपल्याला या रसाचा चांगला फायदा होतो. आपल्यापैंकी बऱ्याच जणांना उसाचा रस प्यायला आवडत नाही परंतु तो पिणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तेव्हा उसाच्या रसाचे अनेक फायदे आहेत जे आपल्यालासाठी गुणकारी आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात खासकरून रसवंती गृहांच्या इथे मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)