Home Remedies for Burn Tongue: सध्या लोकांमध्ये गरम आणि तिखट म्हणजेच स्पायसी पदार्थ खाण्याची क्रेझ वाढू लागली आहे. तरूणाई तर बेफामपणे असे बाहेरचे पदार्थ खाताना दिसते त्यासोबतच आपल्या डाएटकडेही दुर्लक्ष करताना दिसते त्यामुळे त्यांना असे खाणं हे अधिक महागात पडते. अशावेळी आपल्या आरोग्याकडेही दुर्लक्ष होते. परंतु असे पदार्थ खाताना आपल्याला काळजी घ्यावी लागते. अनेकदा आपण जेव्हा गरम पदार्थ खातो तेव्हा आपली जीभ जळते आणि आपल्याला फार संवेदना होतात. दोन मिनिटे आपल्याला काहीही कळतं नाही. त्यामुळे आपल्यासाठी ही एक फार मोठी समस्या होऊन जाते. तेव्हा या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की अशावेळी आपण कोणता उपाय करू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी तुम्ही घरगुती उपाय करू शकता. आपल्याला त्वरित दिलासा मिळावा म्हणून आपण पटकन पाणी पितो. पाणी तुम्हाला नक्कीच दिलासा देईल. परंतु त्याहीपेक्षा तुम्हाला जर का दीर्घकाळ आराम हवा असेल तर तुम्ही हे घरगुती उपाय करू शकता ज्यामुळे तुम्हाला फार त्रासही होणार नाही. तुमच्या घरी मध, मीठ, आईस्क्रिम असे पदार्थ असतील तर तुम्हीही या समस्येसाठी वापरू शकता. तेव्हा चला तर जाणून घेऊया जीभ जळायला लागली की तुम्ही नक्की कोणत्या गोष्टी फॉलो करू शकता. तुम्हाला त्यासाठी फार काहीच करावे लागणार नाही. 


 1. आईस्क्रीम 


तुमची जीभ जर का जळली तर तुम्ही त्यावर बर्फाचा अवारण टाकू शकता. त्यातून तुम्ही आईस्क्रिमही खाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीभेला चांगला आराम मिळेल. 


2. थंड पदार्थ खा


जीभ जळू लागली तर तुम्ही थंड पदार्थ खाऊ शकता. सोबतच ठंड पेयही पिऊ शकता. 


3. थंड फळं खा


तुमची जीभ जर का तुम्हाला फारच त्रास देत असेल तर तुम्ही थंड फळं खा जसे की कलिंगड, नारळाचे पाणी. 


4. मीठाचे पाणी 


जर तुम्हाला जास्त जळजळ होत असेल तर तुम्ही मीठाचे पाणी पिऊन जीभ साफ करू शकता. 


5. मध


मध तुम्हाला आराम देईल. तुम्हाला जीभेची जळजळ झाली तर मधाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता जेणेकरून तुम्हाला चांगला आराम मिळेल. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)