काय सांगताय चेहऱ्यावर चापटी मारली की...? `स्लॅप थेरपी` मध्ये दडलंय सौंदर्य आणि तरुण्याचं रहस्य
Benefits of Slap Therapy : आज अँटी व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस हा स्लॅप डे आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का?, सौंदर्य आणि तरुण्याचं रहस्य हे एका चेहऱ्यावर चापटी मारुन तुम्ही मिळवून शकता.
Slap Therapy For Skin in Marathi : प्रत्येकाला आपण सुंदर दिसावं, आपली त्वचा ग्लो करावी असं वाटतं. त्यासाठी घरगुती उपायांसह आज मार्केटमध्ये लाखो प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. अगदी आज सौंदर्य प्रसाधनासोबत चेहऱ्यावर अनेक सर्जरी आणि इंजेक्शन ट्रिंटमेंट घेतली जाते. या सगळ्यांचा खर्चही लाखोंच्या घरात असतो. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की बस गालावर तुम्ही चापटी देऊन आपलं सौंदर्य खुलवू शकता. हो अगदी बरोबर वाचलं, 'स्लॅप थेरपी' मध्ये सौंदर्यचं सहस्य दडलंय. काय आहे ही 'स्लॅप थेरपी' याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. (What are you saying slapped on the face The secret of beauty and youth is hidden in Slap Therapy in martahi)
काय आहे स्लॅप थेरपी?
खरंच आपण कोणाला मारण्याचा आणि त्यात स्वत: ला मारण्याचा विचारही करु शकत नाही. कोणाच्या कानशिलात देणे हा अपमान मानला जातो. मारणं हे हिंसा आहे, पण या चापटीमध्ये सौंदर्य दडलंय हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. स्लॅप थेरपीमुळे त्वचेतील छिद्र कमी होण्यास मोठी मदत होते. असं म्हणतात की, हळूवार चापट मारल्याने चेहऱ्यावरील रक्त परिसंचरण वाढण्यास मदत मिळते. ज्यामुळे त्वचा तरुण आणि निरोगी दिसण्यास मदत मिळते. कॅलिफोर्निया, यूएसमधील थाई मसाज थेरपिस्ट गॅम पुक्कलानुन म्हणतात की, आपल्या शरीरात ऊर्जा रेषा असून त्याला सेन्स असं म्हणतात. या उर्जा रेषा आपल्या चेहऱ्यावर असल्यामुळे जेव्हा आपण थप्पड मारतो तेव्हा स्नायू शिथिल होतात आणि उर्जा रेषा सक्रीय होतात.
ही थेरपी कशी करावी?
दक्षिण कोरियाच्या लोकांचा असा विश्वास आहे की, हलक्या थप्पडमुळे चेहऱ्याच्या प्रत्येक भागात रक्त प्रवाह वाढण्यास मदत मिळते. ज्यामुळे त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते आणि त्यामुळे चेहऱ्यावर तेज येतं. या थेरपीमध्ये दक्षिण कोरियामधील महिला रोज 50 थप्पड मारून आपले सौंदर्य कायम टिकवून ठेवतात. या थेरपीसाठी यासाठी तुम्हाला तुमच्या दोन्ही गालांना हाताने हलक्या हाताने थप्पड मारायची असते.
पण ही थेरपी करताना एका गोष्टीची काळजी नक्की घ्या, चेहऱ्यावर मारताना दाबाबाबत खूप सावधगिरी घ्यावी. थप्पड सौम्य असावी जेणेकरून तुमच्या त्वचेला इजा होणार नाही, हे लक्षात ठेवावं. ज्या लोकांची त्वचा नाजूक आणि संवेदनशील आहे त्यांनी ही थेरपी करु नये, कारण त्यांची त्वचा लाल पडू शकते.
आपला चेहरा कायम कोमट पाण्याने धुवा, ज्यामुळे छिद्र उघडण्यास मदत मिळते. त्यानंतर मग आपला चेहरा मऊ टॉवेलने पुसून घ्या. मग तुम्हाला वापरायचे असलेले स्किन प्रॉडक्ट त्वचेला गोलाकार पद्धतीने लावा. त्यानंतर वरच्या दिशेने थप्पड मारा.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)