शरीराच्या स्वच्छतेसाठी आपण दररोज सकाळी उठल्यावर आंघोळ करतो. अगदी अनेक वेळा संध्याकाळी काम करुन आल्यावरही रात्रीदेखील आपण आंघोळ करुन मग झोपतो. पण जर तुम्ही आठवडा, महिना अगदी वर्षभर आंघोळ केली नाही. तर याचा परिणाम शरीरावर कसा होतो. तुमच्या शरीरात काय बदल दिसतात. तुम्हाला माहिती आहेच की, जैन भिक्षु आणि नन्स कधीही आंघोळ करत नाहीत. तरीही ते निरोगी आणि स्वच्छ असतात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, जगात अशीही एक जमात आहे जी आंघोळ न करता फ्रेश दिसतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूयॉर्कमधील माउंट सिनाई मेडिकल सेंटरमधील त्वचाविज्ञानाचे सहयोगी क्लिनिकल प्रोफेसर डॉ. कॅमेरॉन रोखसार एका संशोधनात सांगितलं की, तुम्ही जर आठवडा, महिना अगदी वर्षभरात आंघोळ नाही केल्यास शरीरावर काय परिणाम होतात याबद्दल सांगितलं आहे. 


एक प्रकारची दुर्गंधी येते


365 दिवस आंघोळ न करता तुम्ही राहिल्यास तुमच्या शरीरातून एक प्रकारची दुर्गंधी निर्माण होते. हा घाण वास शरीरावर अनेक थर तयार करतात. या साचलेल्या बॅक्टेरियामुळे त्वचेचे नुकसान होतं. एका वर्षानंतर, त्वचेच्या वर स्ट्रॅटम कॉर्नियम किंवा मृत त्वचा तयार होण्यास सुरुवात होते. त्याशिवाय त्यात एक प्रथिने तयार होते जी आपली त्वचा तयार करते ज्याला एक विचित्र प्रकारचा वास येत असतो. त्वचेवर बॅक्टेरिया देखील जमा होतात जे आपल्या घामात मिसळून दुर्गंधी निर्माण करतात.


ब्राऊन फ्लेक्स दिसतील 


त्वचाविज्ञानी डॉ. लॉरेन प्लोच हे म्हणाले की, सुरुवातीला त्वचा तेलकट किंवा कोरडी होते. त्यानंतर बुरशी किंवा यीस्ट आणि नंतर बॅक्टेरियाचा संसर्ग तयार होतो. त्यात त्वचेवर असलेली घाण यामुळे मस्से वाढतात. तुमच्या शरीराच्या तेलकट भागांमध्ये घाण आणि प्रदूषक जमा राहतो. तुमचं शरीर ज्या ठिकाणी सर्वाधिक तेल तयार करते, जसे की तुमच्या कानाच्या मागे, मानेवर आणि स्त्रीच्या स्तनाखाली हे अशा ठिकाणी तयार होत असतात. असं शिकागो कॉस्मेटिक सर्जरी आणि त्वचाविज्ञान विभागाच्या संचालक डॉ. कॅरोलिन जेकब यांनी सांगितले आहे. 


संसर्गाचा धोका जास्त असतो


365 दिवसात आंघोळ न केल्यामुळे अंगावर कट किंवा स्क्रॅच असल्यास संसर्गाचा धोका निर्माण होतो. अंगाला खाज सुटते, जळजळ होते, घाण वास आणि मृत त्वचा जमा होऊन बुरशी लागायला सुरुवात होते. 


तुम्ही आठवडाभर आंघोळ केली नाही तर...


- शरीरावर तेलकट चिकटपणा वाढण्यास सुरुवात होते.
- बॅक्टेरिया, घाम आणि मृत त्वचेच्या पेशी वाढते
- त्वचेचे संक्रमण, पुरळ, कोंडा आणि एक्जिमा, सोरायसिस सारख्या त्वचेच्या स्थिती वाढू लागतात. 
- शरीराची दुर्गंधी वाढते आणि त्वचा खराब होण्यास सुरुवात होते. त्वचा काळी किंवा फिकट होऊ लागते. 


हेसुद्धा वाचा - जैन भिक्षु आणि नन्स कधीच करत नाहीत आंघोळ; पण का? तरी त्याचं शरीर स्वच्छ कसं?


तुम्ही महिनाभर आंघोळ केली नाही तर...


- शरीरावर बॅक्टेरिया, तेल, घाम आणि मृत त्वचेच्या पेशींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास सुरुवात होते. 
- त्वचेवर संक्रमण, पुरळ आणि त्वचेशी संबंधित इतर समस्या निर्माण होतात. 
- त्वचेवर सूज आणि पू निर्माण होतो. 
- शरीरातून दुर्गंधी येते.
- केसांमध्ये कोंडा वाढू लागतो, ज्यामुळे तुमची टाळू लाल, फ्लॅकी आणि खाज सुटते. 


म्हणून दररोज आंघोळ करावी!


संशोधनातून हे सिद्ध झालं आहे त्यानंतर वैज्ञानिक सांगतात की, दररोज आंघोळ नाही केली तरी. तीन ते चार दिवसांनी आंघोळ करणे गरजेचे आहे. आरोग्य आणि स्वच्छतेसाठी आंघोळ आवश्यक आहे. आंघोळीमुळे त्वचा नैसर्गिकरित्या चांगली राहते आणि हानिकारक जंतूंपासून तुमचं संरक्षण होतं.


(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)