कोरोनानंतर अलास्कापॉक्सचे संकट, मांजरांमुळे होतोय गंभीर आजार
Alaskapox virus symptoms : कोरोनाच्या महामारीतून जग सावरले असले तरी काही ना काही नव्या व्हायरसची बातमी ऐकायला मिळत असते. त्यातच आता अलास्कापॉक्सचे संकट अमेरिकेत कोसळले आहे. हा आजार मांजरीपासून होतो, असे एका अभ्यासातून सिद्ध झाला आहे.
What is Alaskapox Virus News in Martahi : कोरोना आणि व्हायरस हे दोन्ही शब्द ऐकले तरी धडकी भरते. कोरोना व्हायरसमधून जग आता कुठेतरी सावरत आहे. त्यातही कधी ना कधी नवीन व्हायरसची नावे ऐकायला मिळतात. अमेरिकेत आता कोरोनाच्या धास्तीनंतर अलास्कापॉक्सचे संकट आले आहे. डिसीज एक्स आणि झोम्बी व्हायरसने अजूनही भीती निर्माण केलेली असताना आता नवी चिंता डोकं वर काढतेय तो म्हणजे अलास्कापॉक्सा व्हायरल. या आजारामुळे अमेरिकेत एकाला आपला जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे. 2015 मध्ये या आजाराबाबत पहिल्यांदा ओळख करुन देण्यात आली.
अलास्का येथे अलास्कापॉक्स या नव्या आणि दुर्मिळ विषाणूमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर या विषाणूला अलास्कापॉक्स असे नाव देण्यात आले आहे. हा व्हायरस सर्वात आधी फायरबँक येथे 2015 मध्ये दिसला होता. त्यानंतर या विषाणूने 7 रुग्ण दिसून आले होते. मात्र या विषाणूमुळे अमेरिकेत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. मृत व्यक्ती वयस्कर होता आणि त्याची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होती.
हा आजार लहान प्राण्यांमध्ये दिसून येत असून माणसामुळे या आजाराचा फैलाव होत असल्याचा पुरावा अजून मिळालेला नाही. मृत व्यक्तीला हा आजार कसा झाला, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मृत व्यक्ती जंगलच्या जवळ राहात होती आणि ते भटक्या मांजरांची काळजी घेत होते. पण या भटक्या मांजरांतही हा आजार दिसून आलेला नाही. यातील मांजराने संसर्ग झालेल्या उंदाराला मारले असेल आणि मांजराच्या नखातून या विषाणूने संबंधित व्यक्तीला संक्रमित केले असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ही आहेत अलास्कापॉक्सची लक्षणे
अलास्कापॉक्स विषाणूची मुख्य लक्षणे म्हणजे त्वचेवर जखम होते. लिम्फ नोड्समध्ये सूज आणि सांधेदुखी अथवा मांसपेशीमध्ये दुखणे, कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते असे अभ्यासातून सांगण्यात आले आहे. अमेरिकेत ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला तो अलास्कापॉक्स या आजाराने झाला आहे.
जर मांजराने नख मारल्यामुळे विषाणूची लागण होत असेल तर मांजराला या विषाणूची लागण झालेली नव्हती. मात्र मांजराच्या नखांमधूनच हा विषाणू पसरू शकतो, अभ्यासात सांगण्यात आले आहे. त्यामुळे योग्य ती काळजी घ्या असे डॉक्टरांकडून आव्हान करण्यात येत आहे.