काय आहे हॉलिडे हार्ट सिंड्रोम? हृदयाशीसंबंधित भयंकर आजार, कसा कराल बचाव?
Holiday Heart Syndrome : नुकतेच आपल्यापैकी अनेकजण नवीन वर्षाचं स्वागत करुन परतले असते. या सुट्ट्यांमध्ये प्रमाणाबाहेर दारुचं सेवन झालं असते. यामुळे अनेकदा हॉलिडे हार्ट सिंड्रोम होण्याची दाट शक्यता असते. हा आजार म्हणजे काय? आणि याला Holiday Heart Syndrome का म्हणतात, जाणून घेऊया.
नाताळ आणि त्यापाठोपाठ नवं वर्षाचं स्वागतं असं जंगी सेलिब्रेशन झाल्यानंतर अनेकजण पुन्हा आपल्या दैनंदिन कामांना लागले असते. पण एवढ्या दिवसांच्या सेलिब्रेशनमध्ये अनेकदा गरजेपेक्षा जास्त दारु प्यायली जाते. तसेच या पार्टीत टेस्टी फूड्स आणि पेय पदार्थ प्यायले जातात. तुम्ही देखील असंच काहीसं केलं असेल तर हॉलिडे हार्ट सिंड्रोम (Holiday Heart Syndrome) चा धोका सर्वाधिक असू शकतो.
हॉलिडे हार्ट सिंड्रोम, नावाप्रमाणेच, सुट्टीच्या काळात या आजाराचा धोका सर्वाधिक असतो. थँक्सगिव्हिंग आणि नवीन वर्षांच्या आसपास हे सिंड्रोम विशेषतः सामान्य आहे. हा हृदयविकाराचा एक प्रकार आहे जो जास्त प्रमाणात मद्यपान केल्यामुळे होतो. यामध्ये हृदयाचे ठोके अनियमित होतात. याशिवाय त्या व्यक्तीला इतर प्रकारच्या समस्यांचाही अनुभव येतो.
दारुच्या अतिसेवनाने होतो त्रास
फेस्टिव सिझनमध्ये सर्वाधिक दारु प्यायल्यामुळे हॉलिडे हार्ट सिंड्रोम (HHS) धोका सर्वाधिक असतो. जास्त मद्यपानाच्या क्रॉनिक आणि सिंगल एपिसोडमुळे HHS होऊ शकतो. म्हणून, आरोग्य तज्ञांनी मद्यपानात संयम ठेवण्याची आणि जास्त मद्यपान टाळण्याची शिफारस केली आहे. चला जाणून घेऊया हॉलिडे हार्ट सिंड्रोमची लक्षणे आणि ते टाळण्याचे मार्ग.
हॉलिडे हार्ट सिंड्रोमची लक्षणे
जेव्हा तुम्हाला HHS असेल तेव्हा तुम्हाला विविध लक्षणे दिसू शकतात. त्यापैकी ही काही प्रमुख लक्षणे आहेत-
अनियमित किंवा जलद हृदयाचा ठोका
चक्कर येणे
चिंता
श्वास घेण्यास त्रास होणे
छातीत दुखणे
हॉलिडे हार्ट सिंड्रोमपासून कसा कराल बचाव
अलाबामा विद्यापीठाच्या बर्मिंगहॅम विभागाच्या कार्डिओलॉजी विभागातील एका तज्ञाने हॉलिडे हार्ट सिंड्रोम टाळण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, हॉलिडे हार्ट सिंड्रोम टाळण्यासाठी...
जास्त प्रमाणात दारू पिणे टाळा
चरबीयुक्त, गोड आणि खारट पदार्थांचे सेवन मर्यादित करा
कॅफिनचे जास्त सेवन टाळा
हायड्रेटेड राहा
नियमित शारीरिक व्यायाम