Benefits of eating banana: या वेळेत केळी खा आणि आजारांपासून लांब राहा
केळी खाण्याची योग्य वेळ असते का? जर हो तर मग ती कोणती वेळ आहे?
मुंबई : निरोगी शरीरासाठी पुरेशी झोप, व्यायाम आणि जेवण या महत्वाच्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी जर वेळेवरती झाल्या नाहीत तर शरीरावरती त्याचा परिणाम दिसू लागतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची निट काळजी घ्या आणि शरीर निरोगी ठेवा. बऱ्याचदा असे होते की, काम करताना जर कोणाला लवकर थकवा येऊ लागला किंवा दिवसभर थकवा जाणवत असेल तर ही शारीरिक दुर्बलतेची लक्षणे दिसू शकतात. यासाठी तज्ज्ञ केळी खाण्याचा सल्ला देतात. केळी हे असे फळ आहे, जे तुम्हाला झटपट ऊर्जा देते. याशिवाय अनेक गंभीर आजारांपासूनही ते तुमचे संरक्षण करते.
परंतु केळी खाण्याची योग्य वेळ असते का? जर हो तर मग ती कोणती वेळ आहे? या बातमीत केळी खाण्याची पद्धत आणि त्याचे फायदे काय हे जाणून घ्या
केळी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे?
केळी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. केळीमध्ये पोटॅशियम असते, ज्यामुळे आपल्या स्नायूंमध्ये क्रॅम्प येत नाही. केळीमध्ये कार्बोहायड्रेट आढळते, जे आपल्या शरीराला ऊर्जा देते आणि आपल्याला कमी थकवा जाणवतो. व्यायामापूर्वी केळी खाल्ल्यास जास्त थकवा जाणवत नाही.
केळीमध्ये पोषक तत्वे आढळतात
केळ्यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी आणि मॅग्नेशियम आढळतात, याशिवाय व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन-बी6, थायामिन, रिबोफ्लेविन देखील असतात. केळीमध्ये ६४.३ टक्के पाणी, १.३ टक्के प्रथिने, २४.७ टक्के कार्बोहायड्रेट असतात.
केळी खाण्याचे फायदे
1. अशक्तपणा दूर होतो
केळीमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट असते. ते खाल्ल्याने पोट लवकर भरते. ऑफिस किंवा कॉलेजला जाण्यामुळे सकाळचा नाश्ता चुकला असेल तर केळी नक्की खा, कारण केळी खाल्ल्याने झटपट एनर्जी मिळते.
2. डिप्रेशनपासून आराम
केळीचे सेवन केल्याने लोकं डिप्रेशनपासून लांब राहतात. रुग्णांना देखील यामुळे आराम मिळतो हे अनेक संशोधनातून स्पष्ट झाले आहे. केळ्यामध्ये असे प्रोटीन आढळते, ज्यामुळे तुम्हाला आराम वाटतो. यामुळेच डिप्रेशनचा रुग्ण जेव्हा केळी खातो तेव्हा त्याला आराम मिळतो.
3. बद्धकोष्ठता पासून आराम
केळीमुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. तुम्ही दररोज रात्री झोपताना दुधासोबत केळीचे सेवन करू शकता. असे केल्याने तुम्हाला बद्धकोष्ठता आणि पोटातील गॅसच्या समस्येपासून आराम मिळेल.
4. पचन सुधारणे
केळ्यामध्ये आढळणारे फायबर पचनक्रिया योग्य ठेवते. योग्य पचनशक्ती असण्याचा परिणाम म्हणजे तुम्ही सर्व आजारांपासून दूर राहता.
5. अॅनिमियाच्या समस्येवर मात होते
अॅनिमिया म्हणजे शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता आणि यावर चांगला उपाय म्हणजे केळी. केळीचे सेवन केल्याने शरीरातील लोहाची कमतरता हळूहळू कमी होते आणि तुमची अॅनिमियाची समस्या देखील सुधारते.
केळी खाण्याची योग्य वेळ
ब्रेकफास्टनंतर केळीचे सेवन करु शकता. केळी खाण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी ८ ते ९.