मुंबई : बिग बॉस 13 विजेता आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. यानंतर मुंबईतील कूपर रूग्णालयात सिद्धार्थ शुक्लाचं पोस्टमार्टम करण्यात आलं. दरम्यान प्राथमिक अहवालानुसार, सिद्धार्थचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं समोर आलं आहे. तर सिद्धार्थ शुक्लाचा व्हिसेरा सध्या सुरक्षित ठेवण्यात आला आहे. कारण केमिकल अॅनालिसीस हिस्टोपॅथोलॉजी अभ्यास अजून करायचा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं मानलं जातंय की, हे दोन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे मूळ कारण समजण्यास मदत होणार आहे. कारण सिद्धार्थने झोपेच्या आधी काही औषधं घेतली होती. त्यामुळे डॉक्टर आणि पोलिसांना प्रत्येक गोष्टी चाचणी करायची आहे.


काय आहे हिस्टोपॅथोलॉजी स्टडी?


अमेरिकन नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या मते, 'सूक्ष्मदर्शकाद्वारे कोणत्याही जीवाच्या पेशी आणि टिश्यूचं परीक्षण करण्याच्या प्रक्रियेला हिस्टोपॅथोलॉजी स्टडी म्हणतात'. या हिस्टोलॉजीमध्ये टिश्यू अभ्यास आहे. 


कोणत्याही बायोप्सी अहवालाच्या अधिक तपशीलासाठी अशा पद्ध परीक्षण करण्यासाठी केला जातो, जेणेकरून एखाद्या व्यक्तीचा रोग ओळखता येईल. जेव्हा टिश्यू तपशीलवार तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जातात, तेव्हा ते वेगळे केले जातात आणि सूक्ष्मदर्शकाखाली तपासले जातात.


सध्या कोणत्याही पोस्टमॉर्टम अहवालाला अंतिम रूप देण्यासाठी हिस्टोपॅथोलॉजीचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. जे वेगवेगळ्या टप्प्यात केलं जातं. ज्यामध्ये सूक्ष्मदर्शकासह चाचणीसह सर्व पेशींची तपासणी केली जाते.


सिद्धार्थ शुक्लाचा गुरुवारी मृत्यू झाला, त्याला थेट कूपर रूग्णालयात नेण्यात आलं. जिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. डॉक्टरांनी सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं स्पष्ट केलंय.