cancer treatment in marathi : जगभरात कॅंन्सर ग्रस्तांचे लक्षणीय वाढ होत आहे.  त्यातच भारतातील प्रत्येक 9 जणांपैकी एका व्यक्तीला कॅन्सर होण्याचा धोका आहे. मग तो पुरुष असो की महिला. ही गोष्ट इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्चच्या संशोधनातून ही बाब समोर आली. कॅन्सरच्या उपचारासाठी लाखो रुपये  खर्च करावे लागतात. एवढं करुन देखील जगण्याची शाश्वती देता येत नाही. मात्र नुकतेच डॉक्टर आणि संशोधकांनी कॅन्सरवरील निदानासंदर्भात एक आनंदाची बातमी दिली आहे. ती बातमी म्हणजे, आता कॅन्सर झाला आहे की नाही यासाठी 50  हजार नव्हे तर 10 रुपये खर्च करावं लागणार आहे.  या 10 रुपयांमध्येच तुम्हाल कॅन्सर झाला की नाही याची माहिती मिळेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकजण असे असतात की, आपल्याला डॉक्टरांकडे जाता येत नाहीत किंवा आपण डॉक्टरांकडे जाण्याला महत्त्व देत नाहीत. आपण काही लक्षणांकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे लवकर निदान होत नाही. कॅन्सर हा असा आजार आहे की जो कोणालाही कधीही होऊ शकतो. त्यामुळे या आजारावर वेळीच उपचार करणे फार महत्त्वाचे असते.  दरम्यान कॅन्सर आहे की नाही, याचे निदान होण्यासाठी प्रयोगशाळेत किमान 50 हजार रुपये किमतीच्या फ्लोरोसेंट फिल्टरच्या मदतीने चाचणी करण्यात येत होती. मात्र यासाठी 10 रुपयांच्या ग्रीन फ्लोरोसेंट फ्लिटर वापरण्यात येणार आहे. त्यामुळे लाखो रुग्णांचा जीव वाचण्यास मदत होणार आहे. कॅन्सर जास्त पसरण्याआधीच त्यावर निदान झाल्यास रुग्णासाठी अनुकूल परिणामांसह उपचार शक्य असतात. 


या चाचणीमुळे लाखोंचा जीव वाचणार


ग्रीन फ्लोरोसेंट फिल्टर पेशींमध्ये विशिष्ट प्रथिने दाखविते. या फिल्टरच्या मदतीने अनुवांशिक रोग, बॅक्टेरिया आणि विषाणू संक्रमणास कारणीभूत पेशी शोधणेही शक्य होईल. तसेच या नवीन चाचणीमुळे रुग्णांना सध्या होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत केवळ 10 ते 15 टक्के रक्कम खर्च करावी लागणार आहे. बरकतुल्ला युनिव्हर्सिटीमध्ये केलेल्या संशोधनामुळे हे शक्य झाले आहे. या संशोधनाला पेटंटही मिळाले आहे. कॅन्सरच्या पेशी कोणत्या स्तरावर आहेत. त्यांची सद्यस्थिती काय आहे आणि त्याचा शरीराच्या कोणत्या भागाकडे जात आहेत. हे शोधणे आत सोपे होणार आहे. 


नेमका वापर काय? 


बीएचयूच्या बायोकेमिस्ट्री आणि जेनेटिक्स विभागाने हे फिल्टर तयार केले आहेत. विभागप्रमुख प्रा. डॉ.रेखा खंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडीचे विद्यार्थी उत्संग कुमार आणि शैलजा सिंघल यांनी या सुधारणा केल्या आहेत. संशोधकांनी सांगितले की यामध्ये हिरव्या रंगाचा वापर विशिष्ट प्रथिनांची निर्मिती दर्शवण्यासाठी केला जातो. सध्या बाजारात उपलब्ध असलेले फिल्टर क्वार्ट्जचे असून ते खूप महाग आहेत. BU मधील नवीन फिल्टर जिलेटिन शीटपासून बनविलेले असून हा पॉलिमरचा एक प्रकार आहे. तो कमी किमतीत उपलब्ध आहे.