Chia Vs Sabja Seeds : निरोगी राहण्यासाठी आज अनेक जण व्यायाम, हेल्दी फूड, डाएट फॉलो करतात. वजन कमी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी सब्जा आणि चिया सिड्सच्या सेवनाचे प्रमाण वाढलं आहे. पण अनेकांना वाटतं सब्जा आणि चिया सिड्स हे एकच आहे. या दोघांमध्ये फरक आहे. बारकाईने पाहास या दोघांमध्ये अंतर जाणवतो. सब्जा आणि चिया हे दोन्ही थंड असतं त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी खूप फायदेशीर असतं.  (what is the difference between sabza and chia know which is better in weight loss health in marathi)


चिया सीड्समध्ये पोषक घटक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिया बियांमधील पोषक घटकांचं बोलायचं झालं, तर यात कॅलरी नसतात. शिवाय ते ग्लूटेन-मुक्त असतं. वजन कमी करण्यासाठी चिया पुडिंग, स्मूदी किंवा सॅलडमध्ये चिया बिया मिसळून खाणे फायदेशीर मानले जाते . चिया बियांमध्ये 6 टक्के पाणी, 46 टक्के कार्बोहायड्रेट, 34 टक्के चरबी आणि 19 टक्के प्रथिने आढळतात. 


तसंच यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीराला फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून तुम्हाला वाचवितात. चिया बियांमध्ये फायबर आणि प्रथिने देखील मुबलक प्रमाणात असातत. 



सब्जा बियांमध्ये आढळणारे पोषक


सब्जाच्या बियांमध्ये कॅलरीज कमी असतात. तुम्ही सब्जाच्या बिया पाण्यात भिजवून सेवन करू शकता . त्याची चव तुळशीसारखी असते. सब्जाच्या बियांचीही स्मूदी तुम्ही करु शकता. 13 ग्रॅम सब्जाच्या बियांमध्ये 2 ग्रॅम प्रथिने, 7 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स, 2.5 ग्रॅम फॅट आणि 1240 मिलीग्राम ओमेगा-3 आढळून येतं. सब्जाच्या बियांमध्ये पेक्टिन आढळते जे भूक कमी करतं, त्यामुळे वजन नियंत्रित राहत. 



चिया आणि सब्जामधील अंतर 


नीट पाह चिया सिड्सचा रंग राखाडी असतो तर सब्जाचा रंग हा काळा असतो. 
तेव्हा हे स्पष्टपणे दिसून येते की चियाच्या बियांचा रंग राखाडी असतो तर भाजीपाल्याच्या बियांचा रंग काळा असतो. 


चिया सिड्स अंडाकृती असतात तर सब्जाच्या बिया या किंचित लांब असतात. 


चिया सिड्स या मूळ भारतीय नाहीत. हे विदेशी बिया आहेत तर सब्जाच्या बिया तुळशीच्या बिया म्हणूनही ओळखल्या जातात. 


चिया सिड्स कोणत्याही डिशमध्ये मिसळून तुम्ही खाऊ शकतात. तर सब्जाच्या बियांना तुळशीचा वास आणि चव असतो. त्या पाण्यातून नुसत्या खाऊ शकता.


सब्जाच्या बिया खूप लवकर पाणी शोषून घेतात, तर चिया सिड्स पाणी शोषण्यास वेळ घेतात आणि रात्रभर त्यांच्या आकाराच्या 10 पट फुगतात. सब्जाच्या बिया फुलल्यानंतरही जेलीसारख्या दिसतात. 



वजन कमी करण्यासाठी कोणते चांगले?


चिया आणि सब्जाच्या बियांमध्ये जवळजवळ समान पोषक तत्वे आढळतात . हे दोन्ही पौष्टिक आणि आरोग्यदायी आहेत. त्यांचे सेवन केल्याने भूक कमी होते. अभ्यासात असं आढळून आलंय की, चिया बिया वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. कारण त्यात आढळणारे फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि प्रोटीनमुळे भूक कमी करते.



(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)