मुंबई : आजकाल स्टाईल म्हणून किंवा फॅशन म्हणून आपण आपल्या केसांना रंग देतो. केस पांढरे झाले तर अनेक जण केस डाय करण्याचा मार्ग निवडतात.इतरांपेक्षा वेगळं आणि प्रेझेंटेबल दिसण्यासाठी आपण आपल्या केसांवर हे प्रयोग करतो.पण केसांवर वारंवार असे डाय वापरल्याने त्याचा वाईट परिणाम फक्त आपल्या केसांवरच नाही तर आपल्या संपुर्ण शरीरावर देखील होण्याची शक्यता टाळता येत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेअर कलरचा सतत वापर हानिकारक 


सतत हेअर कलर किंवा डायचा वापर केल्याने त्यांचा मोठा दुष्परिणाम आपल्या केसांवर होतो. या डायमुळे होणारे परिणाम लक्षात येईपर्यंत आपले केस हे कमकुमत झालेले असतात, किंवा केस गळायला सुरुवात झालेली असते. 


हेअर कलरचा डोळ्यांवर परिणाम


हेअर कलरमध्ये वापरल्या जाणाऱ्या केमिकलचा आपल्या डोळ्यांवर वाईट परिणाम होतो.यामुळे आपली दृष्टीसुद्धा कमकुवत होऊ शकते.ज्यांना दमा- किंवा अस्थमाचा त्रास असणाऱ्या लोकांना हेअर डायमुळे श्वास घेण्याचा त्रास उद्भभवू शकतो. या रंगाच्या अती वापरामुळे विस्मरणाचा धोका ही निर्माण होऊ शकतो. हेअर डायच्या अतिवापरामुळे कर्करोग होण्याची शक्यता दाट असते.


हेअर कलरमुळे अ‍ॅलर्जी 


डाय किंवा हेअर कलरच्या वापरानंतर आपल्याला त्याची अ‍ॅलर्जी झाल्यास लगेचच त्या हेअर कलरचा वापर थांबवणं गरजेचं आहे.
 5 ते 7 मिनिटांत हेअर डायचा रंग केसांवर चढत असेल तर त्यामध्ये केमिकलचे प्रमाण हे सर्वात जास्त असते. याउलट हेअर डाय लावल्याच्या 30 ते 40 मिनिटांनंतर केसांना रंग येत असेल तर त्यात केमिकरचे प्रमाण कमी असते.


हेअर कलरमुळे चेहऱ्यावर परिणाम


वारंवार हेअर डाय वापरल्याने तुमच्या चेहऱ्याचा रंग देखील बदलू शकतो. चेहऱ्यावर आणि हाताच्या त्वचेवर काळे डाग दिसायला सुरुवात होते. 


दुष्परिणाम कसे टाळायचे


हेअर डाय मिक्स करताना काचेचा किंवा प्लॉस्टिकचा वापर करावा. हेअर डायमध्ये जे रंग वापरले जातात ते धातूच्या संपर्कात आल्याने त्याचं रिएक्शन होऊ शकतं. हातात ग्लॅब घालून हेअर डाय वापरावा. चेहऱ्याला दररोज तुम्ही वापरत असलेलं स्कीन क्रिम लावा, ज्याने धोका कमी होतो. चेहऱ्याला रंग लागला तर बेकिंग सोडा किंवा टूथपेस्ट लावू तो काढता येतो.


कशी घ्यायची केसांची काळजी 


अनेक घरगुती प्रकार आहेत, ज्यामुळे तुम्ही केसांना होणारा धोका कमी करु शकता.