Side Effects Of High Hemoglobin: शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आणि आजारांना दूर पळवण्यासाठी शरीरात हिमोग्लोबिनची योग्य पातळी असणे गरजेचे आहे. हिमोग्लोबिनची पातळी कमी असल्यास शरीरात रक्ताची कमतरता जाणवते, हे तर आपल्याला माहितीच आहे. हिमोग्लोबिन नसल्यास अॅनिमियासारखा आजारही होऊ शकतो. पण तुम्हाला माहितीये का शरीरात गरजेपेक्षा जास्त हिमोग्लोबिनची मात्रा आढळली तर काय होऊ शकते. हिमोग्लोबिनची पातळी वाढल्यास तुम्ही आजारी पडू शकतो. अशावेळी काय करावे, हे जाणून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिमोग्लोबिन रक्तातील रेड ब्लड सेलमध्ये असणारे एक प्रोटीन आहे. हिमोग्लोबीनच्या माध्यमातूनच शरीरात ऑक्सिजन पुरवला जातो. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील हिमोग्लोबीनची मात्रा वेगवेगळी असू शकते. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात हिमोग्लोबीनची मात्रा वाढली तर त्या स्थितीला हेमोक्रोमॅटोसिस असं म्हटलं जातं. शरीरात हिमोग्लोबीनची मात्रा 14 ते 15 डेसिलीटर असते. तर, पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनची मात्रा 13.8–17.2 प्रतिडेसिलीटर आणि महिलांमध्ये 12.1–15.1 डेसिलीटर असते. यापेक्षा कमी असेल तरीदेखील काळजी घेण्याचं कारण आहे तर जास्त असेल तरीदेखील काळजी घेण्याची गरज आहे. 


हिमोग्लोबिन वाढल्यास मेंदुवर ताण येतो. विचार करण्याची क्षमता कमी होते. व्यक्ती सतत संभ्रमात राहतो. एखादी गोष्ट समजण्यासाठी वेळ लागतो


शरीरात सतत हिमोग्लोबीन वाढल्यास ऑक्सिजन कमी होतो आणि पॉलिकॅथेमिया नावाचा आजार होतो. त्याचबरोबर रक्ताच्या गुठळ्या होतात. सतत थकवा जाणवणे आणि चक्कर येणे, नाक आणि आतड्यातून रक्तस्त्राव होणे, हिरड्यांतून रक्त येणे अशी लक्षणे आढळतात.


- शरीरात हिमोग्लोबिन वाढल्यास काय काळजी घेण्याची गरज?


- शरीरात हिमोग्लोबिनची मात्रा वाढल्यास तुमच्या जीवनशैलीत बदल करुन मात्रा नियंत्रणात ठेवू शकता. अशावेळी प्रोसेस फुड, तेलकट व तुपकट अन्न खाणे टाळावे. 


- हेल्दी डाएटमध्ये फळे, भाज्या, कडधान्ये, डाळी, प्रोटिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. 


- भरपूर झोप घ्यावी 


- दररोज न चुकता व्यायाम करणे गरजेचे आहे. यामुळं मेटाबॉलिजम नियंत्रणात राहते 


- धुम्रपान आणि मद्यपान टाळा


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)