मुंबई : मांसाहारींसाठी मासे हे अगदी प्रिय असतात. चिकन मटण सोबतच माशांचा आस्वाद घेणं हे केवळ जीभेचे चोचले पुरवण्यासाठी नव्हे तर आरोग्यदायी फायद्यांसाठीही उपयुक्त ठरतात. म्हणूनच तुम्ही पहिल्यांदा मासे खाणार असाल तर थोडी काळजी घ्या.  ... म्हणून आठवड्यातून किमान दोन दिवस मासे खायलाच हवेत !


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मासे खाताना त्यामधील एक महत्त्वाचा अडथळा असतो तो म्हणजे काटे. भरभर खाताना माश्यातील काटे नकळत घासामध्ये येतात. काटा घशामध्ये अडकल्यास तो सतत टोचत राहतो. अशावेळेस काट्याचा त्रास दूर करण्यासाठी काही खास टीप्स नक्की लक्षात ठेवा . 


कसा दूर कराल घशात अडकलेला काटा - 


भात - 


माशाचा काटा घशामध्ये अडकल्यासारखे जाणवल्यास सुका भात एकत्र करून गोळा करा. भाताचा हा गोळा छोटा करा. तो चावता गिळल्याचा प्रयत्न करा. सुक्या भातामुळे अडकलेला काटा दूर होण्यास मदत होते. दररोज भात खात आहात का? तर हे जरुर वाचा...


केळ - 


पिकलेलं केळंदेखील काटा दूर करण्यास मदत करतात. एक केळं शांतपणे आणि हळूहळू चावून खावे. यामुळे घशात अडकलेला काटा दूर होण्यास मदत होते. रोज तीन केळी खा, होतील हे फायदे