Home Remedies:  उंदीराची आवडती जागा ही घरातील कोपरे. अनेकदा या उंदरांमुळे आपली तारांबळ उडते. जर चुकून आपल्याकडून काही अन्न उघडे राहिले तर अन्नाची नासधूस होताना पाहायला मिळते. दिवसा या उंदरांची मस्ती कमी असते पण रात्री त्यांचा धुमाकूळ खूप जास्त असतो. जर त्यांना वेळीच हुसकावून लावले नाही तर ते त्यांचा संपूर्ण बंदोबस्त तुमच्या घरातच करू शकतात. असेच काही घरगुती उपाय आणि टिप्स आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही या उंदरांना न मारता घरातून हाकलून देऊ शकता. (What to do if you want to get rid of house mice without killing them nz)


आणखी वाचा - धनत्रयोदशीला धणे का खरेदी करावेत? एका क्लिकवर पाहा या प्रश्नाचं उत्तर  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


उंदरांना न मारता घरातून बाहेर काढण्याचे उपाय (Getting Rid Of Rats Without Killing Them)


1. कांद्याचा वास


कांद्यापासून निघणारा वास विषारी असतो, त्यामुळे उंदीर पळून जातात. घराच्या मधोमध आणि उंदरांच्या जागी कांद्याचा रस किंवा कांदा कापून ठेवू शकता. 


2. लाल तिखट


लाल तिखटमुळे उंदीर पळून जातात. घरातील उंदरांपासून सुटका करण्यासाठी या टिप्सचा वापर करा. घराच्या दाराजवळ आणि किचनच्या काउंटरवर आणि जमिनीच्या कडांवर लाल तिखट शिंपडा. या ठिकाणी उंदीर सर्वाधिक दिसतात आणि या टिप्सच्या मदतीने तुम्हाला ते पुन्हा दिसणार नाहीत.


आणखी वाचा - बुर्ज खलीफाचा 'हा' Viral Video पाहिलात का? पाहून तुम्ही म्हणाल अद्भूत


 


3. लसूण पाणी


एक ग्लास पाण्यात लसूण किसून चांगले मिसळा. हे पाणी ज्या ठिकाणी उंदीर फिरतात त्या ठिकाणी शिंपडा. उंदीर लसणापासून दूर पळतात. हे मिश्रण अधिक प्रभावी करण्यासाठी तुम्ही त्यात काही लवंगा टाकू शकता


4. लवंग तेल


लवंग तेल लहान उंदीर दूर करण्यासाठी कार्य करते. त्याच्या वापरासाठी, लवंगाच्या काही कळ्या मलमलच्या कपड्यात बांधून उंदरांच्या बिलामध्ये ठेवा. त्यामुळे उंदीरही पळून जातील.


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)