Weight loss tips : आज अनेक जण जीमला प्राधान्य देताना दिसत आहेत. व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर काय खावे याबाबत अनेकांना माहिती नसते. जीमला जाणाऱ्यांनी आहाराची योग्य काळजी घेणे फार महत्वाचे आहे. व्यायामापूर्वी आणि नंतर तुम्ही केलेल्या आहाराच्या निवडी तुमच्या शारीरिक प्रगतीवर परिणाम करु शकतात, ज्यामुळे स्नायू आणि हाडे मजबूत होऊ शकतात. तुम्हालाही जिमला जाण्यापूर्वी आणि नंतर योग्य आहार घ्यायचा असेल, तर काय खावे आणि काय नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.


जीम करण्यापूर्वी काय खावे? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही जीमला जात आहात? व्यायाम करण्यापूर्वी निरोगी आणि योग्य आहार घेणे गरजेचे आहे. हा आहार पूर्णपणे पचण्याजोगा असणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला चांगली ऊर्जा मिळेल आणि तुम्हाला व्यायामासाठी एकदम फिट ठेवेल. वर्कआउटच्या आधी खाणे खूप चांगले असू शकते.


न्याहारी : वर्कआउटच्या एक ते दोन तास आधी हलका नाश्ता केला पाहिजे. यामध्ये तुम्ही दही,  सुपरफूड, फळे इत्यादी निरोगी आणि पूर्णपणे पचण्याजोगे पदार्थ घेऊ शकता.


हायड्रेशन : व्यायामापूर्वी योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन करणे फार महत्वाचे आहे. यामुळे तुमचे शरीर ऊर्जेने परिपूर्ण आणि तयार होईल.


कार्बोहाइड्रेट्स : व्यायामापूर्वी कार्बोहायड्रेट खाल्ल्याने ऊर्जा मिळते. तुम्ही साखर, तांदूळ, ब्राउन ब्रेड, तृणधान्ये, केळी इत्यादींचे सेवन करु शकता.


प्रोटीन :  व्यायामापूर्वी चीज, दही, शेंगदाणे, अंडी इत्यादी हलके प्रथिनयुक्त पदार्थ खाणे तुमच्या शरीराच्या विकासासाठी आणि टोनिंगसाठी फायदेशीर आहे.


जीम केल्यानंतर काय खावे?


प्रोटीन शेक : वर्कआउट केल्यानंतर प्रोटीन शेक पिणे हा एक चांगला पर्याय आहे, कारण यामुळे शरीरातील झिज भरुन निघण्यास मदत होते. आणि स्नायूंच्या वाढीस चालना मिळते. तुम्ही दूध, प्रोटीन पावडर, फळे, नट्स इत्यादी खाऊ शकता.


फळे आणि भाज्या : व्यायामानंतर फळे आणि भाज्या खाल्ल्याने तुम्हाला पोषण मिळते आणि जीवनसत्त्वे, खनिजे, फायबरचे प्रमाण वाढते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलिंगड, काकडी, गाजर, टोमॅटो, पालक, कोबी इत्यादी अनेक प्रकारची फळे आणि भाज्या खाऊ शकता.


अंडी : अंडी हा उच्च-गुणवत्तेचा प्रथिन स्त्रोत आहे. शरीराची वाढ आणि विकासाला चालना देण्यासाठी व्यायामानंतर खाऊ शकतो.


 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)