Women Psychology: अनेकजण संभोग किंवा सेक्स या शब्दांना टॅबू मानतात. याबाबत आजही खुलेपणाने बोललं जात नाही. याबाबत काहीही लिखाण झालं की त्याला चुकीच्या पद्धतीने घेतलं जातं. त्या लेखाच्या खाली अश्लील कमेंट्सचा पाऊस पडतो. मात्र या विषयाकडे सकारात्मकतेने पाहिल्यास याबाबत इतरांनाही माहिती मिळू शकेल आणि आणि पार्टनरमध्ये काही तक्रारी असतील तर त्याही सुटण्यास मदत होऊ शकते. या लेखातून संभोग करत असताना महिलांच्या डोक्यात नेमके काय विचार सुरु असतात (what women thinks while having physical relationship)  याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बातमीतील माहितीने कदाचित तुम्हाला धक्का बसेल (Whats on her mind) . हे कसं शक्य आहे असंही वाटेल. महिला sex दरम्यान कायम पुरुषांबाबत विचार करत नसतात असं एका रिसर्चमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. नेमकं या रिपोर्टमध्ये काय म्हंटलं आहे? महिला sex दरम्यान नेमका कोणता विचार करतात? जाणून घेऊयात.  


कपड्यांचा विचार 


कदाचित हा मुद्दा अनेकांना पटणार नाही. मात्र सेक्सदरम्यान अनेक महिला कपड्यांबाबत विचार करत असतात (thinking of cloths). यातही खासकरून महिला अंतर्वस्त्रांचा विचार जास्त करतात. कोणत्या कपड्यांमध्ये आपण पार्टनरला जास्त आकर्षित करू शकतो, याबाबत विचार सुरु असतो. 


हायजिनचा विचार 


माणसांच्या तुलनेत हायजिनबाबत महिला अधिक सजग असतात (sexual hygiene). अशात सेक्सदरम्यान महिला इंटीमेट भागांची स्वच्छता आणि हायजिन याबाबत अधिक विचार करतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांना (STD) म्हणजेच सेक्श्युअली ट्रान्समिटेड डिसीज होणार नाही ना याबाबत अधिक विचार असतात. 


पार्टनर आणि स्वतःचा गंध 


पार्टनर आपल्या जवळ येतोय हे समजल्यावर महिला आपल्या आणि आपल्या पार्टनरच्या गंधांबाबत विचार करतात (scent of partner). आपल्या पार्टनरच्या तोंडातून किंवा शरीरातून, आपल्या स्वतःच्या तोंडातून किंवा अंगातून दुर्गंधी येतेय का? याबाबत महिला विचार करतात. पुरुषांनी चांगला परफ्युम किंवा सेंट वापरला असेल,  किंवा त्यांच्या शरीरातून सुगंध दरवळत असेल, तर हे महिलांना आवडतं. 


Sex नंतर काय?


अनेकदा महिलेने पार्टनरसोबत पहिल्यांदाच शारीरिक संबंध ठेवले असतील तर अशा महिलांना आता सेक्स नंतर पुढे काय (Whats After Sex) ? हा प्रश्न पडतो. सेक्सनंतर आता पार्टनरला कसं सामोरं जावं? याबाबतही अनेक महिला विचार करत असतात.