Health Tips: कडक उन्हाळ्याच्या दिवसांत आईस्कीम खावं की नाही?
कडाक्याच्या उन्हाळ्यात प्रत्येकाला थंडगार आईस्क्रीम खाण्याची इच्छा होते.
मुंबई : कडाक्याच्या उन्हाळ्यात प्रत्येकाला थंडगार आईस्क्रीम खाण्याची इच्छा होते. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आईस्क्रीम उन्हाळ्यात खावंस वाटतं. आपल्याला वाटतं की, आईस्क्रीम खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळेल आणि उष्णतेपासून आराम मिळेल. मात्र तुम्हाला माहितीये का, उन्हाळ्याच्या दिवसांत आईस्क्रीम खाणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
उन्हाळ्यात आईस्क्रीम खाणं योग्य?
आईस्क्रीम खाण्यास थंड असेल पण त्याचा शरीरावर गरम प्रभाव पडतो. आइस्क्रीममध्ये चरबीचं प्रमाण जास्त असल्याने ते शरीरात उष्णता निर्माण करते. यामुळेच आईस्क्रीम खाल्ल्यानंतर खूप तहान लागते.
उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्ल्याने तुम्हाला अनेक समस्या उद्भवू शकतात. उन्हाळ्यात आईस्क्रीममुळे पोटाचा त्रास होऊ शकतो. आईस्क्रीम खाल्ल्याने घसा खवखवणं तसंच सर्दीचा त्रास बळावू शकतो. तुम्ही आईस्क्रीम खाऊ शकता, पण यामुळे उष्णतेचा त्रास दूर होऊ शकत नाही.
आईस्क्रीम खाण्याचा योग्य ऋतु कोणता?
असं तर तुम्ही वर्षाचे 12 महिने आईस्क्रीम खाऊ शकता. मात्र हल्की सर्दी आणि हलक्या गरमीमध्ये आईस्क्रीम खाल्ल्यास त्रास होणार नाही. मात्र जास्त उन्हाळ्यात आणि सर्दीमध्ये आईस्क्रीम खाणं टाळावं.