जर तुम्हाला मूत्रमार्गात संसर्ग होतो किंवा मूत्राशय अतिसंवेदनशील किंवा अतिक्रियाशील असेल तर काही विशिष्ट पदार्थ तुमची लक्षणे आणखी वाढवू शकतात. हे ओळखणे महत्त्वाचे आहे की, असे पदार्थ देखील आहेत ज्यांचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. मूत्राशयाचे आरोग्य चांगले राखणेयासाठी तुमच्या आहारात खालील पदार्थांचा समावेश करा. जाणून घ्या डॉ जितेंद्र साखराणी, युरोलॉजिस्ट, अपोलो स्पेक्ट्रा मुंबई यांच्याकडून.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

• नाशपाती हे उच्च फायबरयुक्त आणि मॅलिक ॲसिडयुक्त असल्याने मूत्राशयाच्या आरोग्याला चालना मिळते. हे मूत्रमार्गातील खडे टाळण्यासाठी मदत करू शकते. त्यामधील व्हिटॅमिन सी मूत्राशयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
• स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, ब्लूबेरी आणि क्रॅनबेरी यांसारख्या बेरीजमध्ये फ्लेव्होनॉल्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात जे बॅक्टेरियाशी लढतात. त्यांच्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते जे मूत्राशयावाटे विषारी द्रव्य बाहेर काढण्यास मदत करतात.
• आपल्या आहारात ब्राऊन राईस, क्विनोआ आणि बार्ली यांसारख्या धान्यांचा समावेश केल्याने मूत्राशय निरोगी राखण्यास मदत होते.
• ओट्स हा फायबरचा एक मौल्यवान स्त्रोत आहे, जो बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करतो आणि मूत्राशयावरील दाब कमी करून मूत्राशयाचे आरोग्य राखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. ते मूत्राशयासंबंधीत वेदना कमी करण्यास मदत करतात.
• उच्च प्रथिने, फायबर आणि आवश्यक पोषक घटकांमुळे मूत्राशयासाठी सुकामेवा हा आणखी उत्तम स्रोत ठरतो. बदाम, काजू, शेंगदाणे आणि सूर्यफूलाच्या बिया हे मूत्राशयाच्या आरोग्यासाठी चांगले पर्याय आहेत.
• लसणाचा आहारात समावेश केल्याने  मूत्रमार्गाच्या संसर्गाचा सामना करता येतो. यासाठी जेवणात लसुण वापरण्याचा सल्ला दिला जातो
• बीन्स शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात, मूत्राशयाच्या कार्याला चालना देतात आणि मूत्रमार्गाच्या संसर्गाची (यूटीआय) शक्यता कमी करतात.


तुम्ही खात असलेल्या अन्नाचा तुमच्या मूत्राशयाच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. काही खाद्यपदार्थांमुळे तुमच्या मूत्राशयाला त्रास होऊ शकतो आणि तर काही पदार्थ मूत्राशयाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करतात. मसालेदार पदार्थ ही मूत्राशयाच्या अस्तरांवर ताण निर्माण करतात. ज्यामुळे अस्वस्थता आणि वारंवार लघवी होऊ शकते. लिंबूवर्गीय फळांमध्ये अम्लाचे प्रमाण अधिक असते आणि ते मूत्राशयासंबंधीत वेदना वाढवू शकतात.


एस्पार्टम सारख्या कृत्रिम स्वीटनर्सचा मूत्राशयाच्या जळजळीशी संबंध आहे. कॉफी, चहा, चॉकलेट आणि सोड्यामध्ये आढळणारे कॅफिन हे लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ म्हणून कार्य करतात आणि मूत्राशयाच्या स्नायूंना उत्तेजित करू शकते, ज्यामुळे लघवीची वारंवारता वाढते. अल्कोहोलचा देखील मूत्राशयावर असाच प्रभाव असल्याचे ज्ञात आहे, म्हणून हे या पदार्थांचे सेवन मर्यादित करणे किंवा टाळणे योग्य राहिल. तसेच कार्बोनेटेड पेये, टोमॅटो, व्हिनेगर किंवा लोणचे या पदार्थांचे सेवन मर्यादीत प्रमाणात करणे गरजेचे आहे.निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून आणि भरपूर फळे, भाज्या आणि तृणधान्य असलेला आहार घेतल्यास तुमच्या मूत्राशयाचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होईल.