मुंबई : खूप लोक रात्री थकवा आल्यामुळे किंवा वजन वाढतं म्हणून रात्री उपाशी पोटी झोपतात. जर तुम्ही देखील असं करत असाल, तर याचे नेमके काय वाईट परिणाम होतील त्याची माहिती करून घ्या. रात्री जेवण करण्याचे टाळल्यास शरिरातील पौष्टीक तत्वांची कमी होते, मुख्य म्हणजे मायक्रोन्युट्रिशन डिफिसिएंसी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या शरिराला मॅग्नशियम, विटामिन बी १३ आणि विटामिन डी ३ सारख्या मायक्रो न्युट्रिएंट्सची गरज असते. जर कोणत्या व्यक्तीला रात्री उपाशी राहायची सवय झाली तर, तो कुपोषणाचा शिकार होवू शकतो. 


पण कधीतरी उपाशी राहणाऱ्याला हा त्रास होणार नाही. रात्री हलके पदार्थ खाल्ले पाहिजेत, दिवसाच्या जेवणापेक्षा कमी जेवण केलं, हलके पदार्थ खाल्ले तर फायदा होतो. हे बरोबर आहे. पण उपाशी झोपणे हा त्यावरचा उपाय नक्कीच नाही.


जर तुम्ही नेहमी रात्रीचे जेवण टाळता किंवा खाण्या-पिण्याचे नियम पाळत नाही, तर तुमच्या पचनशक्तीवर याचा परिणाम होईल. त्यामुळे तुमच्या इन्शुलीनच्या पातळीवर देखील याचा परिणाम होवू शकतो. 


त्या व्यतिरिक्त कोलेस्ट्रॉल आणि थायरॉईडमध्ये ही गडबड होऊ शकते. जर तुम्ही चांगला आहार वेळेवर घेतला नाही, तर तुमचे हार्मोन्स प्रभावित होतील, ज्यामुळे तुम्हाला खूप प्रकारचे विकार होऊ शकतात.


उपाशी झोपल्याने तुम्ही मेंटली अलर्ट राहतात आणि म्हणून तुम्हाला गाढ झोप देखील लागत नाही.


खूप लोकांना वाटते की वजन कमी करण्यासाठी रात्रीचे जेवण टाळल्यास फायदा होईल, परंतू त्याच्या विरोधात होवू शकतं. हे सत्य आहे की, रात्री हलके खाल्ले पाहिजे, परंतू पुर्ण पण थो़डंस देखील खायचं नाही, हे चांगले नाही. त्यामुळे तुमचे वजन वाढेल होईल. शरीर ऊर्जा गोळा करतं. ज्यामुळे वजन वाढतं. वजन कमी करण्याचा उपाय म्हणजे तुम्ही वेळेवर जेवा आणि पौष्टीक आहार घ्या.