मुंबईः वयाच्या 25 ते 30 व्या वर्षी जेव्हा पहिल्यांदा पांढरे केस दिसायला लागतात तेव्हा टेन्शन येणे साहजिक असते, पण पांढरे केस मुळापासून उपटून फेकून देणे योग्य आहे का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुन्या काळी केस पांढरे होणे हे वृद्धत्वाचे लक्षण मानले जात होते, परंतु सध्याच्या युगात केस 30 व्या वर्षी पांढरे होऊ लागतात. तरुणांसाठी पांढरे केस म्हणजे लाजिरवाणी आणि कमी आत्मविश्वासाचं कारण बनते.


जेव्हा एखाद्या तरुणाला पहिल्यांदा डोक्यावर पांढरा रंग दिसतो तेव्हा तो अनेकदा ते काढून फेकतो. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की असे करू नये कारण यामुळे जास्त पांढरे केस वाढू लागतात, पण यात काही तथ्य आहे का?



वयानुसार केसांना रंग देणाऱ्या पेशी नष्ट होऊ लागतात. जेव्हा या पेशी कमी होतात, तेव्हा टाळूमध्ये मेलेनिन कमी होऊ लागते, त्यामुळे केस पांढरे होऊ लागतात. त्यामुळे एक पांढरा केस तोडल्याने 3 किंवा 4 पांढरे केस वाढतील, ही फक्त कल्पनाच आहे.


जरी केस तोडल्याने जास्त पांढरे केस वाढत नाहीत, परंतु तरीही ही एक चांगली सवय नाही कारण जेव्हा तुम्ही केस मुळापासून तोडता तेव्हा ते टाळूच्या तळाशी असलेल्या पेशींना खराब करते आणि नंतर केसांच्या वाढीमध्ये समस्या निर्माण होतात.